ब्रह्मा-विष्णू-शिवांचे अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला?
कथा आणि महत्त्व जाणून घ्या
ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तिन्हींचे अंश
सर्व देवी-देवतांमध्ये, भगवान दत्तात्रेय हे एकमेव देव आहेत, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तिन्हींचे अंश आहेत. त्यांना गुरु आणि देव या दोघांचे रूप मानले जाते, म्हणून त्यांना श्री गुरुदेवदत्त आणि परब्रह्ममूर्ती सद्गुरु असेही म्हणतात. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी दत्तात्रेय जयंती 26 डिसेंबर 2023 रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे. या दिवशी दत्तात्रेय जयंतीची कथा अवश्य वाचा, दत्तात्रेय देवाची उपासना केल्याने त्रिमूर्तीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. ही कथा एकदा वाचाच.
दत्तात्रेय जयंती कथा
पौराणिक कथेनुसार, एकदा नारदजींनी महर्षी अत्रि मुनींची पत्नी अनुसूया यांच्या पतिव्रतेबाबत कौतुक केले, त्या वेळी देवी सती, देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वती देखील तेथे उपस्थित होत्या. नारदजी गेल्यानंतर, तिन्ही देवींनी ऋषी अत्र्यांची पत्नी अनुसूया देवी हिचा धर्म भंग करण्याविषयी चर्चा सुरू केली. देवतांनी त्यांचे पती ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांना अनुसूयाच्या धर्माची परीक्षा घेण्यास सांगितले. बळजबरीने, तिन्ही देवांनी ऋषींचा वेश धारण केला आणि अनुसूयाची परीक्षा घेण्यासाठी आश्रमात पोहोचले. देवी अनुसूयाने देवांना भिक्षुकांच्या वेशात पाहून भिक्षा आणली परंतु तिन्ही देवतांनी ती स्वीकारण्यास नकार दिला.
ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे रूपांतर लहान बाळामध्ये..
त्रिमुर्ती म्हणाले की आम्हाला अन्न खाण्याची इच्छा आहे. त्यावेळी अत्रि मुनी आश्रमात नव्हते, तेव्हा देवी अनुसुयाने त्रिमुर्तींच्या विनंतीला सहमती दिली. त्यावेळी तिन्ही देवतांनी देवी अनुसुया यांना नग्नावस्थेत भोजन देण्यास सांगितले. त्यावेळी देवी अनुसुया खूप क्रोधित झाल्या आणि तिच्या दिव्य दृष्टीने त्यांना त्रिमूर्तीचे सत्य कळले. तिच्या तपश्चर्येच्या जोरावर देवीने तिन्ही ऋषींना सहा महिन्यांच्या बाळांमध्ये रूपांतरित करून आपल्याजवळ ठेवले. त्यांनी त्यांची काळजी घेतली, आणि भोजन दिले, पण पतीपासून विभक्त झाल्यामुळे तिन्ही देवांच्या पत्नी दुःखी झाल्या, मग नारदजींनी त्यांना घडलेली संपूर्ण कथा सांगितली. देवी लक्ष्मी, देवी सती आणि देवी सरस्वती या तिघांनीही अनुसूयाजवळ जाऊन तिची माफी मागितली आणि तिला त्रिमूर्ती परत करण्यास सांगितले.
अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला
आधी देवी अनुसूयाने नकार दिला, पण नंतर माता अनुसुयाने त्रिमूर्तीचे रूप परत केले. याच त्रिमुर्तींनी देवी अनुसूयाला आशीर्वाद दिला की ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा एक अंश तुझ्या गर्भातून जन्म घेईल. त्यानंतरच माता अनुसूयाने भगवान दत्तात्रेयांना जन्म दिला. त्याचे नाव दत्त ठेवले. महर्षी अत्र्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना अत्रेय असे संबोधले गेले, त्यामुळे दत्त आणि आत्रेय यांचे मिश्रण होऊन दत्तात्रेय हे नाव निर्माण झाले. भगवान दत्तात्रेयांची आराधना केल्याने त्रिमूर्ती प्रसन्न होतात, मुलांना आशीर्वाद आणि वैवाहिक जीवनात सुख आणि शांती देतात. अशी धारणा आहे.
टीप : वरील सर्व बाबी लोकशाही न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही न्युज कोणताही दावा करत नाही.