देश-विदेश
म्यानमारमधील सशस्त्र विद्रोहींच्या गटांनी चिनी सीमेच्या आणखी एका चौकीवर घेतले नियंत्रण !
म्यानमारच्या विद्रोही गटांसमोर देशाच्या सैन्याची पिछेहाट होत आहे. सध्या म्यानमारवर सैन्याचे शासन असल्याने आणि त्याला चीनचेही खुले समर्थन असल्याने सैन्याच्या होत असलेल्या पराभवामुळे चिनी राष्ट्राध्यक्षही चिंतित असल्याचे सांगितले जात आहे.
‘म्यानमारचे सैन्य शासक मिन आंग ह्लाइंग यांचा पराभव होत आहे’, अशीही चर्चा चालू आहे.
सशस्त्र विद्रोहींच्या गटाने चिनी सीमेशी लागून असलेल्या महत्त्वपूर्ण चौकीवर नियंत्रण मिळवले आहे. शान राज्याच्या उत्तरी भागातील कोकांग स्व-प्रशासित क्षेत्राची राजधानी लाउक्काइंग टाऊनशिपमध्ये असलेली ही आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौकी आहे. म्यानमारच्या सैन्याने २ वर्षांपूर्वी लोकशाही सरकारला पायउतार करून सत्तेची सूत्रे हाती घेतली होती.
https://www.navgannews.in/crime/36794/