आंनदाची बातमी, तांदूळ स्वस्त होणार; मोदी सरकारचे कंपन्यांना भाव कमी करण्याचे आदेश!
केंद्र सरकारने तांदळाच्या किरकोळ किमती तात्काळ प्रभावाने कमी करण्याचे निर्देश तांदूळ उद्योग संघटनेला दिले आहेत. या संदर्भात, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी गैर-बासमती तांदळाच्या देशांतर्गत किमतीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. यामध्ये हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
तांदळाचे भाव वाढण्याबाबत चर्चा
बैठकीत चोप्रा यांनी उद्योगांना देशांतर्गत बाजारात किमती वाजवी पातळीवर आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. पीआयबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की उद्योग संघटनांना त्यांच्या असोसिएशन सदस्यांसोबत हा मुद्दा उचलून धरण्याची आणि तांदळाची किरकोळ किंमत तात्काळ प्रभावाने कमी केली जाईल याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. या काळात खरिपाचे चांगले पीक, भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) पुरेसा साठा असून तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही देशांतर्गत बाजारपेठेत गैर-बासमती तांदळाचे भाव का वाढत आहेत?
सरकारकडे चांगल्या तांदळाच्यादर्जाचा साठा
सरकारने गौर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी भावात झालेली वाढ चिंतेची बाब आहे. गेल्या दोन वर्षांत तांदळाच्या वार्षिक महागाई दरात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तांदळाच्या दरवाढीबाबत सरकार आता कठोर झाले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाले आहे.
सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये आमच्याकडे चांगल्या प्रतीच्या तांदळाचा साठा असल्याचे म्हटले आहे. ओपन मार्केट सेल्स स्कीम (OMSS) अंतर्गत व्यापारी आणि प्रोसेसर यांना 29 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, तरीही किरकोळ बाजारात ते 43 ते 50 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.
जुलैमध्ये निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती
देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी आणि किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने जुलै 2023 मध्येच गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यासोबतच निर्यात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यात सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आणि तांदळाची किमान निर्यात किंमत 950 डॉलर प्रति टन केली.
एवढे सगळे प्रयत्न करूनही बाजारात तांदळाच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. नफेखोरी केल्यास शासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.