क्राईम

अश्लील व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार


अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विरोधात पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने तीन सिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका गावातील युवकाने डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत वाईट उद्देशाने पाठलाग करत अल्पवयीन मुलीशी मैत्री प्रस्थापित केली. एवढ्यावर न थांबता तिचा विश्वास संपादन करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढे पीडितेला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. शारीरिक संबंध न ठेवल्यास पीडितेच्या आई-वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडितेने घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर मलकापूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी रविवारी सायंकाळी आरोपी स्वप्निल किसन इंगळे याला अटक केली. त्याच्या विरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button