ताज्या बातम्या

गडचिरोली येथे रविवारी नाट्यश्री कविसंमेलन व प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन


गडचिरोली येथे रविवारी नाट्यश्री कविसंमेलन व प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन.

स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” संपादीत व मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित “रानगर्भ फुलत आहे” या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या १० तारखेस झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर यांचे हस्ते लहूजी मडावी सभागृह, दि आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था, सत्यम टॉकीज जवळ, बसस्टॉपचे बाजूला, धानोरा रोड, गडचिरोली येथे संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष “ऊर्मी”कार प्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रभाकर तांडेकर “प्रदत्त” हे राहणार असून प्राचार्य राजेंद्र कांबळे, नागपूर हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत. तर प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, सिंदेवाही हे काव्य समीक्षण करणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून मा. घनश्याम मडावी, अध्यक्ष, दि आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था, गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी खडकी/बामणी येथे आयोजित ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे (साहित्यिक व कवी) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नाट्यश्रीचे कलावंत व संगीतकार दिलीप मेश्राम, विजया पोगडे हे महामृत्युंजय मार्कंडेश्वर या नाटकातील नांदी व स्वागतगीत सादर करणार आहेत.
या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५२कवी सहभागी झालेले आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी, साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे, योगेश गोहणे, प्रा. अरुण बुरे व सौ. कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button