क्राईम

लग्नानंतर बायकोच रुप पाहताच वीज अधिकाऱ्याला झटका; पोलिसांकडे धाव….


उत्तर प्रदेशच्या बरेलीतील विशाल गौतम वीज विभागात सहाय्यक अभियंता आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचं लग्न झालं. एका नामांकित मॅट्रिमोनिअल साइटवर त्याने नोंदणी केली होती.

तिथं प्रोफाइल पाहिल्यानंतर कनिष्का नावाच्या तरुणीने त्याच्याशी संपर्क साधून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सर्वांच्या समतीने 8 डिसेंबर 2022 रोजी दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर एसडीओ पदावर काम करणाऱ्या या तरुणाच्या आयुष्यात लग्नानंतर असा ट्विस्ट आला की, आता त्याला पोलिसांची मदत घ्यावी लागली.

विशालने पोलिसांकडे न्याय मिळावा, अशी विनंती करत स्वतःच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तरूणाचा आरोप आहे की, लग्नानंतर त्याची पत्नी त्याला ब्लॅकमेल करू लागली. त्यानंतर एके दिवशी संधी मिळताच तिने घरात ठेवलेली करोडो रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन कारमधून पळ काढला.

लग्नानंतर काही दिवसांतच कनिष्काचं रूप पालटले, असा आरोप विशालनं केला आहे. कनिष्कने 18 लाख रुपयांच्या कारची मागणी केली, जी त्यानं कशीतरी पूर्ण केली. विशालने आरोप केला आहे की त्याने कनिष्काला त्याच्या मेहुण्याशी अनेक वेळा व्हिडिओ कॉलवर अश्लील बोलताना पकडलं. तिचा मोबाईल तपासला असता ती अनेक मुलांशी गप्पा मारत असल्याचं दिसून आलं.

तिच्या बहिणी आणि दोन मित्र श्रीमंत लोकांशी मैत्री करतात आणि त्यांना ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यासाठी फसवणूक करतात. त्यानं याबाबत तिच्या पालकांना सांगितलं असता, त्यांनी त्याला धमकावून खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली.

विशालचा एफआयआरमध्ये आरोप आहे, ‘1o एप्रिल रोजी मी ऑफिसमधून अचानक जेवण घेण्यासाठी घरी गेलो असता कनिष्का, तिची आई, काकू आणि दोन अनोळखी व्यक्ती घरी आले. त्यांनी पाच मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये माल भरला होता. त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी मला मारहाण केली. ते निघून गेल्यानंतर घराची झडती घेतली असता साडेतीन लाख रुपये, दागिने आणि कारसह अनेक वस्तू गायब असल्याचं आढळून आलं. 8 नोव्हेंबर 2023 रोजी कनिष्का आणि एका अनोळखी महिलेने 50 लाख रुपये न दिल्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवू, अशी धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button