नरेंद्र मोदी आहेत तर भाजप आहे. महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचं तुलना होऊ शकत नाही
तर तेलंगणाची निवडणूक काँग्रेसने जिंकली. या निकालावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देत असताना राऊतांनी EVM मशीनच्या मुद्द्यावर वारंवार बोट ठेवलं. तसंच संजय राऊत यांनी भाजपला खुलं आव्हानं दिलं आहे.
EVM वर काय म्हणाले?
नरेंद्र मोदी आहेत तर भाजप आहे. महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचं तुलना होऊ शकत नाही. निकाल अपेक्षित नसले तरी तांडव न करता जनमत स्वीकारावं लागेल. दिग्विजय सिंग यांनी EVM बद्दल इंडियाचा मुंबईतील बैठकीत संशय व्यक्त केलं होतं. लोकांच्या मनात अशी शंका असेल तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. EVM च्या जनदेशाचा स्वीकार आम्ही केलंय. आम्ही परत सांगतो एक निवडणूक बेलट पेपरवर घेऊन दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी मोदींना दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं EVM ला दोष देतील. पण तुमच्या मनात का येतंय? तुमच्या हिंमत असेल तर या निकालानंतर मुंबईसह पालिकेच्या निवडणूक घ्या. महाराष्ट्रात हे चालणार नाही. पनौती या टीकेचा काही फटका बसला नाही. या जगात अनेकजण हरलेत कोणी ही माजू नये. या निकाला नंतर कोणाचा माज वाढला हा त्यांचा प्रश्न आहे, असंही राऊतांनी म्हटलंय.
जिंकलेल्यांचं अभिनंदन!
चार राज्यातील निकाल आले, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. Evm च्या माध्यमातून कालचा निकाल आला तो आम्ही स्वीकारतो. कालच्या निर्णयाने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुसरी गोष्ट आज मिझोरमचा निकाल येईल. आम्ही जिंकणाऱ्यांचं अभिनंदन करतोय. तेलंगणातील विजयासाठी राहुल गांधी यांचं पण अभिनंदन करतो, असं राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीच्या बैठकीवर राऊत काय म्हणाले?
कालच्या निकालानंतरही इंडिया आघाडी मजबूत आहे. सहा डिसेंबरला बैठक दिल्लीत होईल. उद्धव ठाकरेही या बैठकीत सहभागी होतील. या राज्याचा निकालानंतर काही मतभेद काही पक्षामध्ये आहेत. मात्र पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. 2014 ला आमच्या सोबत झालं तसं… आता राष्ट्रवादी आणि मिंधे गटाचे काय होईल बघा…, असाघणाघातही राऊतांनी केला आहे.