सुहागरात झाली अन् दुसऱ्या दिवशी घडलं भयंकर, नवरीचा कारनामा पाहून नवरदेवाचे तिन तेरा
लग्न झालेलं जोडपं सुखी संसाराची स्वप्न रंगवतं, पण उत्तर प्रदेशातल्या एका जोडप्याचं हे स्वप्न मधुचंद्राच्या रात्रीच बेचिराख झालं. मथुरा जिल्ह्यातल्या एका जोडप्याचं आदल्या दिवशी संध्याकाळी मंदिरात लग्न झालं.
नवविवाहित पती-पत्नी व कुटुंबीय घरी येऊन झोपले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात, तर नववधू घरातून गायब झाली होती. पोलीस या प्रकरणाची माहिती घेत आहेत.
लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे, लग्न झाल्यावर हुंड्यापोटी घरातून बाहेर काढल्याचे अनेक प्रकार स्त्रियांच्या बाबतीत घडतात. उत्तर प्रदेशात मात्र वेगळीच घटना घडलीय. लग्न करून घरी घेऊन आलेल्या नवविवाहितेनं मधुचंद्राच्या रात्रीच घरातून पळ काढला व नवरा आणि सासरच्यांना धक्का दिला. या घटनेमुळे नवरा व सासरचे लोक हादरून गेले. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
कसबा सौंख इथे राहणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांपैकी एका मध्यस्थानं सोनभद्र इथल्या मुलीशी त्याचं लग्न जुळवलं. शनिवारी (2 डिसेंबर) सकाळी मुलीकडची मंडळी मुलीसह सौंख इथे आली होती. सध्याकाळी मुलगा व मुलीचं एका मंदिरात लग्न लावण्यात आलं. लग्नाचे सगळे विधी व्यवस्थित पार पडले. त्यावेळी मध्यस्थाला काही पैसेही देण्यात आले होते.
शनिवारी संध्याकाळी लग्न लागल्यानंतर रात्री नवरा-नवरी व कुटुंबिय त्यांच्या घरी परतले. रात्री सगळे घरी झोपले, पण रविवारी सकाळी उठून पाहतात, तर नवरी घरातून गायब झाली होती. त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली, पण नवरीचा कुठेच पत्ता लागला नाही. लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा प्रकार झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रबल प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेची माहिती त्यांना मिळाली आहे, मात्र त्याबद्दलची लेखी तक्रार दाखल झालेली नाही. तशी तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबद्दल निश्चितच कारवाई केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे. लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना मुलाच्या कुटुंबियांनी भेटायला बोलावलं आहे. या प्रकरणात मध्यस्थांकडून फसवणूक झाली आहे, की मुलीकडच्या लोकांनी फसवणूक केली आहे, हे पोलिसांच्या तपासात समोर येईल. त्याचबरोबर पळून गेलेल्या नवरीचाही शोध अजून लागलेला नाही. ती सापडल्यास बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ शकेल.