पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार ,धक्कादायक घटना
राज्यात लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केला.
पैठण तालुक्यातील तेलवाडी येथून ही घटना समोर आली आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेत पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मोसंबी आणायला जायच्या बहाण्याने दोघांनी शेतात नेलं. यानंतर दोघांनी झोपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकणी संजय मच्छिद्र मोहिते आणि विलास विनायक मुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेजाऱ्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
तेलवाडी येथे शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आरोपींनी मोसंबी आणण्याच्या बहाण्याने शेतात नेलं. यानंतर तिच्यावर झोपडीत अत्याचार केले. सदर घटना मुलीच्या भावाला कळाल्याने त्याने मुलीला पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी सोबत पीडित मुलीची आई आणि बहीण पोलीस ठाण्यात आले. यावेळी आरोपी संजय मोहिते याने दिवाळीपूर्वी अत्याचार केला होता, असं मुलीने सांगितलं. तसंच कोणाला याबद्दल सांगितलं तर जीवे मारेल, अशी धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे आपण याबाबत कोणाला सांगितलं नाही, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार –
मुंबईतूनही एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका 23 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही तर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.