शेवगाव बोधेगाव मार्गावर महिलांचा रास्ता रोको ; दारुबंदीसाठी नारीशक्ती एकवटली
शेवगाव तालुक्यात महिलांनीच दारुबंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली,याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील राक्षी गावातील अवैध धंदे आणि दारूचे दुकाने बंद करावेत यासाठी महिला आणि ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना वारंवार निवेदन दिले होते. मात्र या गंभीर गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे महिला व ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्ता रोको सुरू केला.
जोपर्यंत हे दुकाने बंद होत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील अशी भूमिका महिला व ग्रामस्थांनी घेतली आहे. राक्षी येथे गेल्या चार ते पाच वर्षापासून दारू विक्री खुलेआम सुरू आहे काही वर्षापासून गावातील लहान बालक तसेच तरुण वर्गाला दारूचे व्यसन लागले असून काहींचे संसार मोडले आहेत.
गावातील अनेक तरुण दारूच्या व्यसनाने बेरोजगार झाले आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत त्याकरिता महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत दारू दुकाने बंद करावे आणि अवैध धंदे बंद करावेत या मागणी करता रस्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे काही काळ मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली होती.