बीड कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे भाजपात प्रवेश करणार
बीड : कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे (Suresh Kute) हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचा हे भाजपमध्ये (BJP) अमित शहा (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थिती प्रवेश होणार आहे. दिल्लीत (Delhi) हा प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भाजपचं बळ आणखी वाढणार आहे.
कुटे उद्योग समूहाने (The Kute Group) अल्पावधीमध्ये मोठी झेप उद्योग क्षेत्रात घेतलेली आहे. तिरूमला (Tirumalla) हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड कुटे उद्योग समूहानं तयार केलेला आहे. कापड दुकान ते 19 कंपन्यांचा 17 हजार कोटी रुपयांचं असेट असलेला ‘द कुटे ग्रुप’चे चेअरमन सुरेश कुटे महाराष्ट्रातील मोठ्या उद्योजकांमध्ये समाविष्ट असलेलं मोठं नाव. तसं पाहायला गेलं तर सुरेश कुटे राजकारणापासून लांबच राहणं पसंत करत होते. पण अचानक त्यांनी घेतलेल्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.