विहिरीतून वाहते स्वर्णरेखा नदी,विहिरीच्या पाण्यातून चक्क सोन्याचे कण बाहेर पडतात…
एक विहीर झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये वसली आहे. या विहिरीतून वाहते स्वर्णरेखा नदी. भलीमोठी विहीर तिथेच नदी म्हणजे वाचताना भयानक वातावरण वाटू शकतं. मात्र असं अजिबात नाहीये…
उलट या विहिरीत देवांचा वास असल्याचं गावकरी सांगतात. कारण विहिरीच्या पाण्यातून चक्क सोन्याचे कण बाहेर पडतात. खरंतर त्यावरूनच इथून वाहणाऱ्या नदीला स्वर्णरेखा असं नाव पडलं. आता विहिरीतच सोनं म्हटल्यावर आजूबाजूचे गावकरी मालामाल असणार, असा विचार मनात येऊच शकतो. परंतु विहिरीत अगदी सोन्याची खाण जरी असली तरी गावकऱ्यांना कष्ट करूनच भाकरी मिळवावी लागते. कारण इथलं सोनं चोरणाऱ्यांना आजवर कधी सुखाची झोप लागली नाही. त्यामुळे तशी हिंमतच कोणी करत नाही.
विहिरीजवळ प्राचीन शिव मंदिर आहे. तिथले पुजारी देवेंद्र सांगतात की, ही विहीर फार वर्षांपूर्वीची आहे. ती किती खोलवर आहे हे कोणालाच माहित नाही, कारण तिचं तळ आजवर कोणीही गाठू शकलेलं नाही. मात्र कितीही ऊन पडलं, तरी वर्षाचे बारा महिने या विहिरीत ओलावा असतो. तिची एक पातळी ठरलेली आहे. तिच्यात कायम तेवढंच पाणी असतं. पातळीच्या खाली कधी पाणी जात नाही किंवा वरही येत नाही.
सोनं चोरल्यास वाटेतच काळाचा घाला!
लोक या विहिरीतून पाणी घेऊन जातात. अनेकदा असं होतं की, पाण्यात सोन्याचे बारीक कण येतात. एकदा, दोनदा असंही झालं की, काहीजणांनी हे सोनं सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचा वाटेतच भीषण अपघात झाला. त्यामुळे आता या पाण्यात लहान कण आले किंवा मोठे कण आले, तरी लोक सोनं पुन्हा विहिरीतच सोडतात. दरम्यान, याच सर्व चमत्कारांमुळे या विहिरीत दैवी शक्ती आ,हे असं गावकरी मानतात आणि इथं पूजा करतात. शिवाय घरात कोणतंही शुभकार्य असेल, तर इथलं पाणी आवर्जून नेलं जातं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. लोकशाही न्यूज24 मराठी त्याची हमी देत नाही.)