जरांगे पाटीलांची मागणी बदलली; स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्या !
मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये सभा पार पडली. या सभेला हजारो मराठे उपस्थित होते. या सभेतूनच जरांगे पाटील यांनी सरकारला स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.
अंतरवलीतील सभेएवढी मोठी सभा आहे. हे पुणेरी मराठे आहेत. यांच्या नादी लागू नका. आपण बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. असं जरांगे पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्या. स्वतंत्र प्रवर्गाला ५० टक्क्यांत बसवा. ज्यात मराठ्यांचं हित नाही तो जीआर आम्हाला मान्य नाही. सरकारने दिलेल्या जीआरमध्ये वंशावळ हा शब्द टाकण्यात आला होता तो जीआर मराठ्यांच्या हिताचा नव्हता. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मराठ्यांच्या नादी लागू नका. आता सुट्टी नाही. आरक्षण घ्यायचंच. नेमकं काय करायचं ते २२ ऑक्टो. ला सांगणार.” असं जरांगे पाटील म्हणाले.