तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पतीची केली हत्या,अन..
अकोला : धक्कादायक प्रकार अकोल्यात घडल्याचे समोर (Akola) आले आहे. या प्रकारात एका ४० वर्षीय विवाहितेने २४ वर्षीय तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ( Crime News) ओढले.
यानंतर प्रियकर बनविलेल्या तरुणाला लावून आपल्या पतीची हत्या केली
अकोला जिल्ह्यातल्या ग्राम उगवा गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ४० वर्षीय महिलेने एका २४ वर्षीय तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्याच्याजवळ आपल्या सर्व सुख-दुःख सांगताना आपलं दुःख त्याच्यासमोर असं ठेवलं की त्या तरुणाला समोर काय होईल याचा अंदाजही आला नाही. महिलेच्या प्रेमात बुडालेल्या या तरुणाला महिलेने हाताशी धरत त्याच्याच मदतीनं आपल्या ५० वर्षीय पतीची हत्या केली.
१८ दिवसानंतर झाला उलगडा
दरम्यान पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह उगवा शेतशिवारातील गवतामध्ये फेकून देण्यात आला. तब्बल १८ दिवसांनंतर हा मृतदेह समोर आला. अकोला पोलिसांनी चार दिवसांत या संपूर्ण घटनेचा गुह्याचा उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी आरोपी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.