इस्राइलनं भारत – पाक सामन्यानंतर केलं ट्विट,आम्ही खूश झालो, आता…
वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा केलेला हा आठवा पराभव होता.
यानंतर भारतात एकच जल्लोष करण्यात आला.
मात्र भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचे पडसाद इस्राइलमध्ये देखील पडले आहेत. इस्राइनले आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका चाहत्याने हातात नरेंद्र मोदी आणि बेंजामिन न्येतन्याहू यांच्या मैत्रीपूर्ण फोटो अन् भारत इस्राइल सोबत असा मजकूर लिहिलेलं पोस्टर झळकावलं.
हा फोटो इस्राइलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला.
We were really moved by Indian friends showing their solidarity with Israel 🇮🇱
We are happy that India🇮🇳emerged victorious in the #INDvsPAK match at #CWC23 and that Pakistan was unable to attribute its victory to the terrorists of #Hamas. https://t.co/tvgYATe0Af
— Israel ישראל 🇮🇱 (@Israel) October 15, 2023
फोटो शेअर करून त्याला ‘भारतीय मित्राने इस्राइलला पाठिंबा दिल्याने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पाकिस्तानला आता त्यांचा विजय दहशतवादी हमासला समर्पित करता येणार नाही.’ असे कप्शन देखील दिले.
हमासने इस्राइलच्या नागरी वस्तीवर मिसाईल हल्ला केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही इस्राइलसोबत असल्याचे जाहीर केलं होतं. तर भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडू मोहम्मद रिझवानने आपली खेळी गाझा पट्टीतील लोकांना समर्पित केला होता.