महाराष्ट्र

नवसाला पावणारी आई. श्री. सोमजाई देवस्थानच्या वतीने ग्रामस्थांकडुन नवरात्रौत्सव भक्तिभावाने साजरा होणार.


 

नवसाला पावणारी आई. श्री. सोमजाई देवस्थानच्या वतीने ग्रामस्थांकडुन नवरात्रौत्सव भक्तिभावाने साजरा होणार.

 

मुंबई : (महेश कदम ) वाकी. बु. ता.महाड. जि. रायगड येथे प्रचलित असणारी, प्राचीन काळापासून ऐतिहासिक अशी नवसाला पावणारी पाशान मुर्ती आई श्री. सोमजाई देवी. श्री. सोमजाई देवस्थानच्या वतीने रविवार दि: १५/१०/२३ ते मंगळवार दि: २४/१०/२३ पर्यंत नवरात्रौत्सव थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. आई सोमजाई ही नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी, मनोकामना पूर्ण करणारी अशी प्रचलित आहे. नवरात्रौत्सवात आईच्या मंदिराची साफसफाई करून मंदिर सजवले जाते. मुर्तींना नटवले जाते. मंदिराच्या अंगणात रांगोळी व रोषणाई केली जाते. भक्तीमय वातावरण दिसते. नवरात्रौत्सवात ह्या दैनंदिक कार्यक्रमाची रुपरेषा अशा प्रकारे दिली आहे. दि: १५ रविवार रोजी. दुपारी २.०० वाजता आईची घटस्थापना व महाआरती होणार असून रात्री हरिजागराचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात येणार आहे. तसेच दररोज सळग नऊ दिवस सकाळी ८ ते ९ वा. व सायंकाळी ६ ते ७ वा. महाआरती होणार आहे. दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसाद ठेवले आहे. व रात्री हरिजागराचा कार्यक्रम प्रतेक गावातील ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात येणार आहे. ह्यात गावठण, शिवाजीनगर, नानेमाची आवाड, धनगरवाडी, शेवते, खरकवाडी, आंब्याचा माळ, आदिवासीवाडी, पेडामकरवाडी, नांद्रुकवाडी, नारायण वाडी, शेदुरमळई ह्यांचा कडून हरिजागर, भजन, कीर्तन, आरती असे दैनंदिन कार्यक्रम होणार असून. सोमवारी १६ ता. रात्री ९ ते ११ वा. ह.भ.प. श्री. मंगेशबुवा जाधव. गाव: भावे यांच्याकडून भजन होणार आहे. दि: २२ सकाळी १० वा. दुर्गाअष्टमी निमित्त सोमजाई मंदिरात होम हवन व रात्री ९. वा. जंगी नाचाचे सामना ठेवले आहे. तसेच २४ ता. दुपारी २.०० वा. बळीदान व विसर्जन होणार असून सर्व भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती सोमजाई देवस्थान मंदिराचे अध्यक्ष: श्री. संजय गंगाराम कदम, श्री. प्रकाश चंद्रु दरेकर: उपाध्यक्ष, श्री. श्रीरंग भागोजी भोसले: सचिव. श्री. अमोल भाऊ जाधव: खजिनदार ह्याचा कडून करण्यात आली असून विश्वस्त श्री. दिपक यशवंत कदम, श्री. प्रदीप रघुनाथ कदम, श्री. गणपत विठोबा सालेकर, श्री. मोहन रामचंद्र म्हामुणकर, श्री. प्रभाकर दिनकर म्हामुणकर, श्री. सदाशिव दगडु मोरे, श्री. सुरेश मोतीराम म्हामुणकर, श्री. रोहिदास रामा जाधव, श्री. बबन शिवराम मोरे, श्री. द्वारकानाथ जाधव सर. सरपंच अदी मान्यवर उपस्थित राहून पाठींबा देणार आहे. ह्या नवरात्रौत्सवात अनेक चाकरमणी, राजकीय नेते येथे येऊन भेट देऊन आईचा दर्शन घेऊन खणानारळाची ओठी भरतात, नवस फेडतात. शिमगोत्सवात तर आईची पालखी मिरवणूक गावागावात फिरवली जाते. अशा प्रकारे १२ वाडीतील ग्रामस्थ उपस्थित राहून सहकार्य करुन आनंदाने, भक्तिभावाने थाटामाटात, जयघोषाने उत्सव साजरा करणार आहेत. आई. श्री. सोमजाईचा देवीचा उदो उदो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button