सासवड आगारातील बसस्थानक स्वच्छता अभियान
सासवड आगारातील बसस्थानक स्वच्छता अभियान अंतर्गत सौ. रंजना दुर्गाडे, कर आणि प्रशासक अधिकारी, सासवड नगर पालिका यांचे हस्ते स्वच्छता संबंधित प्रशस्तीपत्र सासवड आगार प्रमुख श्री. सागर मोहन गाडे यांना आगार बसस्थानक व परिसरातील स्वच्छता बाबतीत आज दिनांक ०१-१०-२०२३ रोजी “स्वच्छता ही सेवा आणि माझी वसुंधरा” स्वच्छता दुत म्हणून आगारास देण्यात आले आज रोजी सासवड बसस्थानकावर “शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल” त्रिशूळ सोसायटी, सासवड या शाळेतील स्काऊट गाईड चे विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी बसस्थानक फलाट, तसेच आगारातील स्थानक प्रमुख श्री. माळशिकारे साहेब आणि श्री गायकवाड सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि कैलास जगताप, सुंदरम खोमणे ( वाहतूक नियंत्रक ) , आणि आगार कार्यशाळेतील प्रमुख श्री पिंगळे साहेब आणि कार्यशाळा कर्मचारी तसेच लेखाशाखेतील श्रीमती गिरमे, भागवत मॅडम, स्थानक सफाई कर्मचारी वृंद श्रीमती छाया पवार आणि श्री. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून “स्वच्छता ही सेवा आणि माझी वसुंधरा” स्वच्छता अभियान अंतर्गत चांगले कामकाज आज रोजी केलें, सासवड नगर पालिका अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहभाग व मार्गदर्शन लाभले, यामध्ये श्रीमती रंजन दुर्गाडे मॅडम, कर आणि प्रशासक अधिकारी ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. आणि बसस्थानकावर आज रोजी स्वच्छता अभियान ची मोहोर उमटवली.