ताज्या बातम्या

सासवड येथे बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान संघटनेची पहिली मिटींग उत्साही वातावरणात संपन्न


सासवड येथे बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान संघटनेची पहिली मिटींग उत्साही वातावरणात संपन्न

सासवड : बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान पुणे, नोंदणी क्रमांक पुणे / ००० १०९६ / २०२३ या संघटनेची नोंदणी ७ सप्टेंबर २०२३ रोजी रोजी अधिकृतपणे झाली असून,या संघटनेची पहिली सभा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी. व्ही ,तथा ज्ञानोबा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २४ / ९ / २०२३ रोजी सकाळी ठिक ११ – ३० वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड ता. पुरंदर येथे संपन्न झाली,

मिटींगची सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष डी.व्ही .तथा ज्ञानोबा वाघमारे यांच्या शुभहस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिटींग सुरु करण्यात आली, यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव नेटके, सचिव डॉ.विनायक गायकवाड, खजिनदार सुनिल जगताप, संघटनेचे कार्यकारी सदस्य विष्णूदादा भोसले बळीराम सोनवणे , राहुल गायकवाड, विजय जगताप ,गुलाबराव सोनवणे , पुरुषोत्तम पवार सुहास बेंगाळे संदीप बेंगळे, सुनिल रणपिसे, बापू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते,

यावेळी विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक व आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम राबवून , जात पात धर्म यांच्या पलीकडे जाऊन, मानवतावादी दृष्टीकोनातून , शोषीत वंचित घटकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी , बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे, एक व्यापक उद्दीष्ट घेऊन ही संस्था काम करणार आहे, त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठान या आज लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष कसा होईल यासाठी , सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डी.व्ही. तथा ज्ञानोबा वाघमारे यांनी केले,

आवश्यकतेनुसार पदांची निर्मिती करण्यात यावी या संस्थेच्या घटनेच्या पोट नियमा नुसार, संघटेत कार्याध्यक्षपद असावे व त्याचा कार्यकाळ सर्वांना संधी देण्याच्या दृष्टीने १ वर्षाचा असावा अशी सुचना विष्णूदादा भोसले यांनी मांडली , हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, व पहिले वर्षे कार्याध्यक्ष म्हणून सुहास राजाराम बेंगाळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली, या मिटींगमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आले, मिटींगची सुरुवात संघटनेचे सचिव डॉ विनायक गायकवाड यांनी , संघटनेच्या घटनेचे वाचन करून करुन केली, यावेळी सर्व पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेतला , प्रतिष्ठानचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानोबा वाघमारे व सुहास बेंगाळे यांचा संघटनेच्या वतीने गुलाबगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, राहुल गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button