कर्मवीरांनी केलेले शैक्षणिक कार्य दीपस्तंभा सारखे – मा.विजयराव शितोळे.
कर्मवीरांनी केलेले शैक्षणिक कार्य दीपस्तंभा सारखे..मा.विजयराव शितोळे.
पांगारे – रयत शिक्षण संस्थेचे न्यू,इंग्लिश स्कुल पांगारे विद्यालयात कर्मवीर जयंती समारोह संपन्न झाला.22 सप्टेंबर रोजी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढलेली होती.जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुमित काकडे अध्यक्ष, रोटरी क्लब,पुरंदर प्रमुख अतिथी तथा प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य साधना विद्यालय हडपसर मा.विजयराव शितोळे,प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ.प्रवीण जगताप विश्वनिरंजन हॉस्पिटल, सासवड , मा.तानाजी काकडे पो.पाटील,पांगारे,मा.प्रवीण ननावरे अध्यक्ष तंटामुक्ती कमिटी, पांगारे मा.अमर क्षीरसागर थोर देणगीदार, स्थानिक स्कुल कमिटीचे सन्मानिय सदस्य मा.रामराजे काकडे,मा.दामोदर काकडे व मा. निलेशभाऊ काकडे उपस्थित होते.त्याचबरोबर श्री.रविंद्र काकडे,राहुल काकडे व सौ.रोशना काकडे हे उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे नंदकुमार यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचा इतिहास,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय स्तरावरील होत असलेले प्रयत्न व विद्यालयातील अडचणी मांडल्या. विद्यार्थी मनोगतामध्ये कु.अक्षदा काकडे व कु.सानिका काकडे यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्याची थोरवी सांगितली.मा.रामराजे काकडे व मा.दामोदर काकडे यांनी ही मनोगते व्यक्त केली. प्रमुख वक्ते मा.विजयराव शितोळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक कार्य,इतर संस्थेच्या तुलनेत रयत ही कशी वेगळी हे सांगितले.कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य आजही दीपस्तंभा सारखे तेवत आहे याचा आवर्जून उल्लेख केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.सुमित काकडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी मिळून प्रयत्न केला तर विद्यार्थी उत्तुंग शिखरावर पोहचतील असे मत व्यक्त केले.डॉ.प्रवीण जगताप यांनी आपल्या मनोगतामध्ये अनेक सेवाभावी संस्थांकडून विद्यालयास मदत केली जाईल असे आश्वासन दिले. कै. हरुबाई गुलाबराव काकडे व कै.सौ. प्रमिला कृष्णराव काकडे यांच्या स्मरणार्थ श्री.कृष्णराव गुलाबराव काकडे यांचेकडून विद्यालयातील सर्व इयत्तामध्ये प्रथम आलेल्या मुले व मुलींना कायम ठेवीतून रोख रक्कमचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती मोहिते एस.पी यांनी मान्यवरांचा बोलक्या शब्दात परिचय करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन श्री.मेमाणे एस.जी यांनी तर आभार श्री.भोसले जी.एन यांनी मानले.