हिंदी भाषेचा प्रचार,प्रसार अधिक होणे ही काळाची गरज – श्री.मेमाणे एस.जी
हिंदी भाषेचा प्रचार,प्रसार अधिक होणे ही काळाची गरज – श्री.मेमाणे एस.जी
रयत शिक्षण संस्थेच्या पुरंदर तालुक्यातील पांगारे विद्यालयात १४ सप्टेंबर हिंदी दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. हिंदी दिवस कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे एन.ई यांनी प्रोत्साहन दिले.कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी हिरीरीने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक तथा रयत शिक्षण संस्थचे आजीव सेवक यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला हिंदी साहित्यिक संत कबीरदास, संत तुलसीदास यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे एन.ई यांच्या हस्ते करण्यात आले.हिंदी दिवस याबद्दल श्री.मेमाणे एस.जी यांनी आपले विचार हिंदी भाषेतून व्यक्त केले.आपल्या मनोगतामध्ये हिंदी भाषा राष्ट्रीय अस्मिता आणि गोष्ट आहे. सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या भारत देशात हिंदी दिवसाचे महत्व फार मोठे आहे.हिंदी दिवस इतिहास,महत्व व उद्देश स्पष्ट केला.आधुनिक काळात हिंदी भाषेचा अधिक प्रभावीपणे प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे निवेदन श्री.पिलाने व्ही.जे यांनी केले.आभार सौ.कांबळे एस.डी यांनी मानून कार्यक्रम संपन्न झाला.