पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती दौऱ्याला सुरुवात;14 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात
भाजप नेत्या पंकजा मुंडे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर,त्यांच्या या दौऱ्याला शिवशक्ती दौरा असं नाव देण्यात आलं आहे.
पंकजा मुंडे आपल्या या दौऱ्यामध्ये महाराष्ट्रातील शिव अर्थात महादेवांचे सर्व ज्योतिर्लिंग आणि शक्ति म्हणजे महाराष्ट्रातील सर्व देवांचे शिक्तिपीठं यांचे दर्शन घेणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून झाली आहे. त्यांनी आज सकाळी सात वाजता गारखेडा परिसरात असलेल्या भगवानबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं व आरती केली. त्यानंतर त्यांनी सकाळी साडेसात वाजता ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराकडे प्रस्थान केलं.
घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्या कोपरगावला रवाना झाल्या.पंकजा मुंडे यांची प्रतिक्रियादरम्यान ‘ही यात्रा नाही परिक्रमा आहे. श्रावण महिन्यात शिवशक्ती परिक्रमा करत आहे. गेल्या सोमवारी हा कार्यक्रम ठरला होता. मात्र दिल्लीत बैठक लागली म्हणून चार तारखेपासून हा दौरा करण्याचा निर्णय घेतला.
योगायोग असा आहे की आज भगवान बाबा यांची जयंती देखील आहे. मी माझ्या शक्तिंचं दर्शन घेत आहे. अहिल्यादेवी यांनी सगळ्या मंदिरांचा जिर्णोध्दार केला. मी उतनार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.
काहीही झालं तरी खचणार नाही’, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी आपल्या या दौऱ्याबाबत बोलताना दिली आहे.सर्व पक्षीय नेत्यांकडून पंकजा मुंडे यांचं स्वागतदरम्यान पंकजा मुंडे यांनी आपल्या या दौऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी किनारी असलेल्या कोपरगाव बेट येथे दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्या मंदीराला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणीं मोठं मोठी होर्डींग लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी होर्डिंग लावले आहेत.