क्राईम

जावयाचा कारनामा,श्रीमंत सासुकडून दहा लाखांची खंडणी उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे अपहरण


पिंपरी-चिंचवड येथे जावयाने श्रीमंत सासूलाच गंडविण्याचा प्रकार पुढे आला आहे. श्रीमंत सासू असल्याने तिच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरामध्ये समोर आला आहे. याकरिता जावयाने कटकारस्थान रचले. परंतु, एवघ्या काही तासातच जावयाचा कारनामा समोर आला आहे. या प्रकाराने सारेच थक्क झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार समोर आला आहे.

आपल्या श्रीमंत सासुकडून दहा लाखांची खंडणी उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले आहे. सचिन मोहिते ह्या जावयाने तीन महिन्यांपूर्वी अपहरणाचा कट रचला होता. अपहरण करण्यासाठी सचिन मोहितेने आपल्या मेहुणीचा मोबाईलही चोरला होता. त्यांच मोबाईलचा वापर करत त्याने अपहरणाच्या गुन्ह्यांत खंडणी मागण्यासाठी देखील केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अपहरण करता जावई सचिन मोहिते यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः च्या आणि मेहुनीच्या मुलीचे अपहरण करून त्यांना आपल्या वाघोली येथील घरी डांबून ठेवले.

काही तासातच उघडकीस आला प्रकार
रक्षाबंधाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने आरोपीसह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली होती. नातीचे अपहरण केल्याने सासू पैसे देईल; या उद्देशाने हे अपहरण करण्यात आलं होतं. परंतु, काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button