क्राईममुंबई

मुंबई एअरपोर्टवर बॉम्ब,10 वर्षांच्या मुलाने उडवली मुंबई पोलिसांची झोप


मुलाने केलेल्या कॉलमुळे मुंबई पोलिसांची (mumbai police) चांगलीच धावपळ उडाली. मुंबई एअरपोर्टवर बॉम्ब (bomb) असल्याचे त्या मुलाने फोनवरून सांगितल्यावर तातडीने शोधमोहिम राबवण्यात आली.

मात्र त्यात काहीच न सापडल्याने हा एक फसवणूक (haux call) करणारा कॉल असल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात राहणाऱ्या एका मुलाने 112 या पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक वर फोन केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती या मुलाने फोनवरून पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने शोधमोहिम राबवत पोलिसांनी तपास केला. मात्र त्यात काहीच निष्पन्न झाले नाही, कुठेही बॉम्ब सापडला नाही. त्यामुळे हा एक फसवणूक करणारा कॉल असल्याचे घोषित करण्यात आले. 10 तासांनंतर टेकऑफ करणाऱ्या विमानात हा बॉम्ब असल्याचे त्या मुलाने सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे प्रकरण एका लहान मुलाशी संबंधित असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाहीत. साधारणपणे असे हॉक्स कॉल केल्यावर पोलिस आरोपींवर गुन्हा दाखल करतात. तथापि, मुलांशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये, त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते जेणेकरुन भविष्यात ते आपल्या मुलांना अशा प्रकारचे कॉल्स करण्यापासून रोखतील. तसेच बाल न्याय कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा पर्यायही पोलिसांकडे आहे.

मुंबईत हॉक्स कॉलची ही पहिलीच घटना नाही. सुमारे महिनाभरापूर्वी मुंबई पोलिसांना असाच एक फसवा फोन आला होता. 2008 मध्ये झालेल्या 26/11 बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर हल्ला होणार असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button