ताज्या बातम्या

शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजींनी गुरुजींचा केलेला अपमान सहन न झाल्याने गोंधळ, पैसे वळवण्याचा विषय तूर्त स्थगित


गुरुजींनी एकमेकांचा केलेला अपमान सहन न झाल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्येच मानापमानचे चांगले नाट्य शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये रंगले. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला .सत्ताधारी जोपर्यंत आपल्या बद्दल माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही सभा चालू देणार नाही असा पवित्रा घेत एकच गोंधळ घातला अखेरीला महत्त्वाचा असलेला सभासदांचे पैसे वळवण्याच्या निर्णयाला स्थगिती देत, कमिटी नेमून निर्णय घ्यावा असे एकमेकांमध्ये ठरल्यामुळे ही सभा पुढे सुरू राहिली.कायम ठेव वर्ग करू नका, सभासदांना त्यांच्या हक्काचे पैसे द्या, रुग्णालय बांधण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षक सभासदांनी विरोध दर्शवला, सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये विरोधकांनी जोरदार सभागृहामध्ये घोषणाबाजी करत फलक झळकावत सत्ताधाऱ्यांना चांगला जाब विचारला. यावरून सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला, यावर बँकेचे बापूसाहेब तांबे यांनी उगाच गोंधळ घालू नका, विरोधासाठी विरोध करू नका कमिटीने तीन महिन्याचा निर्णय घ्या, अशी भूमिका मांडली होती. ती सभासदांना मान्य नाही म्हणून आता नव्याने कमिटी नेमण्याचा निर्णय संजय कळमकर यांच्या अधिपत्याखाली ही कमिटी घेईल असे सर्वानुमते ठरले. नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 104 वी सर्वसाधारण सभा आज सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी पार पडली. बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली होती या सभेला सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

 

सर्वसाधारण सभेपुढे एकूण 16 विषय ठेवण्यात आलेले होते, त्यात महत्त्वाचा विषय जो होता तो म्हणजे कायम ठेवीमधून प्राथमिक शिक्षक विकास महामंडळाकडे रक्कम वर्ग करण्याबाबत असा विषय होता. पहिले दहा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मंजूर करण्यात आले, त्यानंतर हा विषय सुरू झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी विरोधी असलेल्या काही शिक्षकांनी नामंजूर नामंजूर अशा जोरदार घोषणा यावेळी केल्या. बँकेचे अध्यक्ष मोटे यांनी आपण या संदर्भामध्ये सर्व चर्चा करायला तयार आहोत, गोंधळ घालू नका असे सांगितले. त्यानंतर बँकेचे जेष्ठ माजी संचालक संजय कळमकर यांनी हा विषय घेण्यामागचा उद्देश विचारला. बँकेच्या सर्व सभासदांचे हित लक्षात ठेवण्यात निर्णय घ्यावा अशी मागणी केली. यावेळी सभासद विकास जवखेडे यांनी पैसे वर्ग करण्याचा ठराव हा सभासदांना विचारून करण्यात यावा, जर तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर बँकेच्या नफ्यातून पैसे द्या ,असे त्यांनी सांगितले. या ठरावाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर सभासद विकास डावखरे यांनी, आपल्या अगोदरच्या नेत्यांनी 52 गुंठे जागा घेतलेली आहे, आपल्याच पाल्यांचा विचार करत त्यांनी ही जागा घेतलेली आहे. या ठिकाणी प्रकल्प होत असून ती एक चांगली बाब आहे पण तुम्ही हे करत असताना सर्व रक्कम कशा पद्धतीने उभी करणार याचा अगोदर विचार करायला पाहिजे होता, त्यामुळे प्रत्येक सभासदाचे म्हणणे ऐकण्यासाठी आपण शाळेमध्ये जा व प्रत्येकाचे म्हणणे जाणूनच पुढील निर्णय घ्या तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवावा अशी मागणी त्यांनी केली.

 

सभासद आबासाहेब दळवी यांनी ठाण्यातील रुग्णालयाची घटना पाहता अशाप्रकारे आपण जर हॉस्पिटल सुरू करायला गेलो तर आपल्याला सर्व बाबींचा विचार करावा लागेल असे सांगितले. जर नैसर्गिक घटना झाली त्याला जबाबदार कोण असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. विकास मंडळाला काय करायचे त्यांना ते करू द्या. आपण याच्या भानगडीत पडू नका असेही ते म्हणाले. प्रकाश दळवी यांनी सुद्धा सभासदांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय घ्या तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवा अशी मागणी त्यांनी केली. बँकेचे माजी अध्यक्ष संजय धामणे यांनी या सभेच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी बाउन्सर आणले आहेत का असा सवाल करत एकच गोंधळ सभागृहामध्ये पाहायला मिळाला व त्यांच्या म्हणण्याला सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत एकमेकांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली. तुम्ही बोलू देत नाही असे म्हणल्यानंतर सभागृहांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते, यानंतर धामणे यांनी दोन्ही संस्था या वेगवेगळ्या आहेत जर तुम्हाला निर्णय घ्यायचा होता तो एकत्रितपणे सभा का घेतली नाही? अशी घेता येते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला तुम्हाला जर विरोधकांना विचारायचे नसेल व परस्पर निर्णय घ्यायचा असेल तर ही दडपशाही चालणार नाही वेळ प्रसंगी आम्ही वरिष्ठांकडे दाद मागू अन्यथा न्यायालय सुद्धा जाऊ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला, त्यामुळे हा ठराव स्थगित करावा अथवा रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहामध्ये केली.

 

या नंतर शरद वांढेकर या प्रतिनिधींनी बोलण्यास सुरुवात केल्यावर सत्ताधाऱ्यांची बाजू घेतल्यावर एकच गोंधळ झाला तुम्ही मुद्द्याचं बोला असे म्हणत विरोधकांनी त्यांनाच धारेवर धरले व मला बोलू द्या असे म्हणल्यानंतर चांगलीच शाब्दिक खडा जंगी या सभागृहामध्ये पाहायला मिळाली त्यांच्या बाजूने विरोधक धावत गेल्यामुळे सत्ताधारी व विरोधक आमने-सामने या ठिकाणी आले. बँकेचे जेष्ठ नेते बापूसाहेब तांबे यांनी तुम्ही विरोधासाठी विरोध करणे हे अगदीच चुकीचे आहे. आम्ही सत्ताधारी सर्वांचे ऐकून घेतले आहे. प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर द्यायला तयार आहोत आतापर्यंत ही सभा चांगल्या पद्धतीची विरोधासाठी विरोध करून सुख करून घेऊ नका असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधाकांना दिला. त्यांनी सांगितले की आपल्या अगोदरच्या लोकांनी ही 52 गुंठे जागा घेतली आहे ती जागा बांधली गेली पाहिजे व त्या ठिकाणी काय तो निर्णय झाला पाहिजे ठेकेदाराचे एक कोटी दहा लाख रुपये अद्याप पर्यंत आपण देणं बाकी आहोत सात महिने झाले आज बांधकाम झालेले नाही, जर ते ठेकेदारांनी वेळेत केले नाही तर त्याला आपण दंड करू मात्र आपल्याला नियमांचे उल्लंघन करता येणार नाही असे त्यांनी सांगितले व यावरून सभागृहांमध्ये चांगलाच वादक झाला अखेरीला तांबे यांनी सर्व संघटनांनी एकत्रितपणे सभासद देऊन कमिटी स्थापन करावी व याबाबत निर्णय घ्यावा असा झाला.

 

संजय कळमकर व संजय धामणे या विरोधकांचा केलेला अपमान सहन न झाल्यामुळे गुरुजींनी एकमेकांच्या अपमान केला असे म्हणत जोपर्यंत सत्ताधारी माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही सभा चालू देणार नाही अशी भूमिका घेत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा सुद्धा प्रकार या सर्वसाधारण सभेमध्ये घडला माफी मागा माफी मागा अशी जोरदार घोषणाबाजी सुद्धा सभागृहांमध्ये विरोधकांकडून झाली तर काही शिक्षक एकमेकांच्या अंगावर सुद्धा धावून गेले तर काहींच्या हातातून माइक हिसकावला, अखेर पोलिसांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला हे सुद्धा या ठिकाणी घडले. नंतर बोलताना संजय कळमकर यांनी जर मी बोललो नाही तरी सभा सुद्धा होणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे सर्वेसर्वा असणारे बापूसाहेब तांबे यांच्याशी मी कोणतीही पैज लावायला तयार आहे निश्चितपणे मी जिंकेल असा दावा त्यांनी यावेळी केला. उगाच वाटेल ते बोलू नका असा इशाराही त्यांनी सभासदांना दिला. आपण जर आपल्या जागेमध्ये काही इमारत उभी करू शकलो नाही तर आपल्या सारखे दुर्दैव नाही हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे आपण शिक्षक आहोत याचे भान ठेवा अशी भूमिका घेतली. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे येऊन ही इमारत उभी करण्यासाठी काय करता येईल त्यावर एकमत होऊन हा विषय तात्पुरता स्थगित करुया. जे मंडळ आहे त्या मंडळाची तात्काळ आजच बैठक होईल व त्यातून कमिटी स्थापन झाल्यावर ते सर्वानुमते निर्णय घेतील असे ठरले.

 

बापूसाहेब तांबे यांचे भाषण सुरू झाले असताना माजी अध्यक्ष संजय धामणे यांनी थेट सभागृहाच्या मध्यभागी होऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. तुम्ही कोणालाही नाव ठेवू नका असे म्हणत ते तांब्यांच्या बाजूने धावत गेले व त्यामुळे सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला. विरोधकांनी सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांचे विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देऊन फलक फडकवले व अखेरीला पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली व त्यानंतर हा गोंधळ थांबला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button