खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकाची केली पाहणी
खडकवासला : चांदणी चौकात पादचारी मार्ग नाही, माहिती फलक हे खूप छोटे आहेत. ते मोठे असले पाहिजेत, बसने येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांची व त्यांना घ्यायला येणाऱ्यांनी कोठे थांबायचे, रिक्षा थांबे नाहीत.ही अडचण आहे.
त्याबाबत योग्य जागा नाही. अशा अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आम्ही पाठपुरावा करू. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पहिल्यांदा चांदणी चौकाचे उद्घाटन झाल्यानंतर पाहणी केली. पुलाचा वापर कसा होतोय, काय अडचणी आहेत, पाहणी करीत नागरिकांशी चर्चा केली. येथील त्रुटींबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांनी माहिती दिली.
सुळे म्हणाल्या, चांदणी चौकाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी वेळोवेळी मदत केली. माजी नगरसेवक सचिन दोडके यांचे योगदान आणि सातत्य होते. हाच रस्ता पुढे वारजे, वडगावला गेल्यावर अरुंद होतो. ही बाब त्यांनी आवर्जून सांगितली. दिल्लीत गडकरींची भेट घेतली. वारजे येथील प्रश्नाबाबत आम्ही गडकरी यांना निवेदन दिले आहे. ते प्रश्न देखील लवकरच सुटतील.
ठाण्यातील दवाखान्यात झालेल्या मृत्यूबाबत, सुळे म्हणाल्या, यात लोक गेले आहेत. माणुसकीच्या नात्याने या घटनेकडे पाहण्याची गरज आहे. याबाबत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न विचारला आहे.
राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, महागाई बेरोजगारी, कांदा, टोमॅटोचे प्रश्न, सिलेंडरचे वाढते दर, हे देशासमोरचे प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तो प्रश्न मला जास्त महत्त्वाचा वाटतो. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम सुरु आहे.
यावेळी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काका चव्हाण, सचिन दोडके, सायली वांजळे, विशाल तांबे, बंडू केमसे, त्रिबंक मोकाशी, सुरेश गुजर, सविता दगडे, स्वप्नील दुधाने, महादेव कोंढरे, दगडू करंजावणे, शुक्राचार्य वांजळे, कुणाल वेडे, किरण वेडे उपस्थित होते.