पती-पत्नीचा वाद पोहचला विकोपाला, अंदाधुंद गोळीबारात.
भोपाळ : मध्य प्रदेशातील मुरैना येथील युवकाने आपल्या पत्नीसह साळा आणि आणखी एकावर गोळीबार केला. घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मुरैना येथील युवकाने पत्नीची गोळी झाडून हत्या केली.या गोळीबारात आणखी दोघांना गोळ्या लागून त्यांचाही मृत्यू झाला. तिसऱ्या एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. या गोळीबारात एकूण तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले.
पत्नी माहेरी जात असताना अडवले
पती-पत्नीच्या वादामुळे पत्नी भावाला बोलावून आपल्या माहेरी जात होती. याची माहिती मिळताच पतीने त्यांना रस्त्यात अडवले. अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना रविवारी दुपारी बागचिनी ठाण्याअंतर्गत घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे.