प्रीमियम’मधून बेस्टची होतेय चांदी मुंबईकरांकडून दिवसाला साडेतीन लाख
मुंबई: मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टची प्रीमियम बस सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. प्रीमियम सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवी मुंबई, ठाणे, मुंबई विमानतळ अशा विविध मार्गांवर सेवा उपलब्ध केली आहे.या सेवेमुळे बेस्ट प्रशासनाला दिवसाला साडेतीन लाखांचा महसूल जमा होत आहे.
मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाने १२ डिसेंबरपासून प्रीमियम लक्झरी बससेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम बस विविध मार्गांवर धावतात. दर अर्ध्या तासाच्या अंतराने धावणाऱ्या या बसमधून ३ हजार ६०० प्रवासी प्रवास करीत आहेत.
ही आहेत प्रीमियम वैशिष्ट्ये-
‘बेस्ट’च्या ‘चलो ॲप’द्वारे या बसमधील आसन आरक्षित करता येते. या बस दर ३० मिनिटांनी धावत असून आरामदायी सीट आहेत. याशिवाय जेवढी आसने तितकेच प्रवासी प्रवास करू शकतात.
मिळणारा प्रतिसाद पाहता या बस आणखी इतर मार्गांवर चालविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
प्रीमियम बसची संख्या वाढल्यास कोणत्या मार्गावर या बस चालवायच्या त्याबाबत ठरविण्यात येणार आहे.
या मार्गांवर धावतात बस
ठाणे – बीकेसी
वांद्रे – बीकेसी
विमानतळ – कफ परेड
विमानतळ – खारघर
विमानतळ – ठाणे
ठाणे – अंधेरी
गुंडवली – बीकेसी
खारघर – बीकेसी
बेलापूर – बीकेसी
विमानतळ – गुंडवली