राष्ट्रवादी तर फुटली मग तुमच्याबरोबर, दादांबरोबरही तेच कार्यकर्ते, असं कसं? सुप्रिया सुळेंनी दिलं ‘असं’ उत्तर.
जळोची – बारामतीमध्ये 25 जून पासून पवार कुटुंब फिरकलेलं नव्हतं अशी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होती. मात्र काल-परवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर आज सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सांत्वन पर भेटीच्या निमित्ताने दौरा केला.या दौऱ्याअगोदर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आता राष्ट्रवादीचे नेमके कोण असणार त्याची उत्सुकता सर्वांनाच होती. कारण राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी हे अजित पवार यांच्या गटात सामील झालेले आहेत.
काल-परवा शरद पवार आल्यानंतर देखील या पदाधिकाऱ्यांनीही गोविंद बागेकडे पाठ फिरवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. परंतु सुप्रिया सुळे यांच्यासोबत शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे यावेळी सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता की, राष्ट्रवादी फुटल्याचे दिसते मग दादा बरोबरही तेच कार्यकर्ते आणि तुमच्याबरोबर तेच कार्यकर्ते असं कसं ? त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीमध्ये कार्यकर्ते नाही ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. बारामती हे माझं माहेर आहे, आजोळ आहे आणि माझी कर्मभूमी देखील आहे. म्हणून राजकारण राजकारणाच्या ठिकाणी या ठिकाणी वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत त्यामुळे हा विचारांचा लढा आहे. तो विचारांच्या पद्धतीने सुरू राहील, आणि हे कार्यकर्ते नाहीत तर हे जोडलेली माणस आहेत, प्रेमाची माणस आहेत, म्हणून ती बरोबर आहेत.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी दुसरा प्रश्न विचारला जिरायती भागातील लोकांना राष्ट्रवादीतील फूट आवडलेली नाही तर त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुश्किल पणे आम्ही राजकारण करण्यासाठी नवीन समाजकारणासाठी राजकारणात आलो आहोत आणि संपूर्ण पवारांची पिढी तशीच आहे. अगदी पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या सख्ख्या भगिनी सर्वज पाटील यांचे पती एन. डी. पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते. अर्थात ते जरी शेतकरी कामगार पक्षात असले आणि वारंवार काँग्रेसवर विशेषतः शरद पवारावर टीका करत असले तरी शरद पवार किंवा पवार कुटुंबाचे आणि पाटील कुटुंबाचे नातेसंबंधात कुठलीही उणीव किंवा कमतरता आली नाही, दिसली नाही, त्यामुळे राजकारण समाजकारण आणि कुटुंब हे वेगवेगळे ठेवण्यास कुटुंब प्रगल्भ आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.