ताज्या बातम्या

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे.


पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर एका युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य सात आरोपींचा शोध सुरु आहे. मृत युवकाच्या नावावर एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, जुन्या वैमनस्यातून आरोपीने खून केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

नितीन म्हस्के (वय ३५) हा बुधवारी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास मंगला चित्रपटगृहाबाहेर चित्रपटाचा लेट नाईट शो पाहून बाहेर पडला होता. यावेळी त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर तलवारी, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

 

शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय 32), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय 24), इम्रान शेख (वय 32), पंडित कांबळे (वय 27), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय 24), लॉरेन्स पिल्ले (वय 33), सुशील सूर्यवंशी (वय 30), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय 25), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय 24), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 20), विवेक भोलेनाथ नवधरे (वय 27), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय 21), विशाल भोले (वय 30, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर हल्ला केल्यामुळे म्हस्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला तुरुंगात डांबण्यात आले आणि या वर्षी मे महिन्यात जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून प्रतिस्पर्धी टोळी त्याचा पाठलाग करत होती आणि त्याचा काटा काढण्यासाठी वाट पाहत होती. म्हस्के याच्यावर बुधवारी हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत तीन मित्र होते, त्यांना आरोपींनी चित्रपटगृहातून बाहेर पडण्यास सांगितले आणि त्यांच्यावर हल्ला केला.

 

कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलच्या बाहेर नितीन म्हस्के, अजय साळुंके आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सागर कोळनट्टी याच्यावर नोव्हेंबर 2022 मध्ये हल्ला केला होता. कोळनट्टी आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमधून वाढदिवस साजरा करुन बाहेर आल्यानंतर पार्किंगच्या परिसरात म्हस्केने त्यांना गाठून सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर कोळनट्टीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीसांनी म्हस्के आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचाच बदला म्हणून सागर आणि त्याच्या साथीदारांनी म्हस्केचा काटा काढल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button