इंडियन पेले म्हणून त्यांची ओळख, लोक करायचे पूजा, कोण होता हा महान फुटबॉल खेळाडू ?
हैदराबाद, क्रिकेट हा खेळ भारतातला एक धर्म झाला आहे असं त्याच्या लोकप्रियतेमुळे म्हटलं जातं. त्यामुळे या खेळातील खेळाडू देशातील लहान मुलांनाही माहीत असतात. हॉकी, कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन या खेळातही भारताने नाव कमवलं आहे पण या खेळांतले खेळाडू फारसे प्रसिद्ध नाहीत.
फुटबॉल या जगात सर्वत्र खेळल्या जाणाऱ्या खेळातही अनेक दिग्गज खेळाडूंनी देशाचं नाव मोठं केलं आहे. अशी कामगिरी करणारे दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद हबीब यांचं मंगळवारी निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. आपलं शहर हैदराबादमध्ये हबीब यांनी अखेरचा श्वास घेतला.
सत्तरच्या दशकात तीन-तीन खेळाडूंना एकट्याने चकवत फुटबॉल पुढे नेणारे जबरदस्त फुटबॉलर म्हणून हबीब प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूमुळे देशातील फुटबॉलजगतावर शोककळा पसरली आहे.हबीब 1975 पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळले. फुटबॉलमधील योगदानाबद्दल हबीब यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. कोलकात्यातील प्रसिद्ध मोहन बागान या क्लबकडून हबीब खेळायचे.
मोहन बागानची मॅच पेले यांच्या न्यूयॉर्क कॉसमॉस टीमविरुद्ध झाला होता तेंव्हा हबीब यांनी जबरदस्त गोल केला होता, ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलं आहे.असं होतं करिअरभारतीय फुटबॉल टीमचे माजी कॅप्टन हबीब यांचा जन्म 17 जुलै 1949 ला झाला होता. भारतासाठी ते 35 आंतरराष्ट्रीय फुटबॉल मॅचेस खेळले त्यात त्यांनी 11 गोल केले होते. हबीब यांनी हल्दियामधील भारतीय फुटबॉल संघ अकादमीचे मुख्य कोच म्हणूनही काम केलं होतं.(दिग्गज क्रिकेटपटू वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेणार, वर्ल्ड कपसाठी भारतात येणार!)अखिल भारतीय फुटबॉल महासंघचे अध्यक्ष कल्याण चौबे म्हणाले, ‘कोलकाता फुटबॉलचे बड़े मियाँ हबीबजी मोहन बागान आणि टीएफएमधले माझे कोच आणि मेंटॉर होते. 1970 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेल्या कांस्य पदकात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं ते कायम लक्षात ठेवलं जाईल.’फुटबॉलच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणाऱ्या हबीब यांना उतारवयात डिमेन्शिया आणि पार्किन्सन हे आजार झाले होते.
हबीब यांनी हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत.बैंकॉकमध्ये 1970 ला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय टीममध्ये हबीब होते. ते मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मडन स्पोर्टिंग या टीमकडून खेळले. नंतर ते टाटा फुटबॉल अकादमीत कोचही होते.पेलेंनी केलं होतं कौतुक1977 मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर मोहन बागानविरुद्ध महान फुटबॉलपटू पेले यांच्या न्यूयॉर्क कॉसमास टीमची मॅच झाली होती.
मुसळधार पावसातही हबीब यांनी प्रतिस्पर्धी संघावर गोल केला होता. प्रतिस्पर्धी टीममध्ये पेले, कार्लोस अल्बर्टो, जॉर्जियो सी असे धडाकेबाज खेळाडू होते. ही मॅच 2-2 अशी ड्रॉ झाली होती. मॅचनंतर पेले यांनी हबीब यांचं कौतुक केलं होतं.(भारताचे 3 अष्टपैलू, सामना जिंकून देण्याची ताकद; तरी World Cupमध्ये संधी दूरच)मोहम्मद हे एक आक्रमक मिडफील्डर होते जे फॉरवर्ड खेळाडूंना चकवत त्यांना गुंतवून ठेवायचे.
ते वेगाने धावायचे आणि ड्रिब्लिंग करायचे म्हणून ते फॉरवर्डलाही उत्तम खेळायचे. त्यांच्या जबरदस्त फुटवर्कमुळे त्यांना ‘भारताचे पेले’ असंही म्हटलं जायचं. 1966 ते 1983 या 17 वर्षांत सिटी ऑफ जॉय कोलकत्त्यामध्ये फुटबॉलने विविध चमत्कार घडवणारे हबीब प्रचंड प्रसिद्ध होते. ते फुटबॉलविश्वात इतके लोकप्रिय होते की हैदराबादचे असलेल्या हबीब यांची पूजा केली जायची. फुटबॉलपटूंचं कुटुंब अशीच त्यांच्या कुटुंबाची ओळख होती कारण सगळे सहा भाऊ फुटबॉलपटू होते आणि हबीब यांना त्याचा सार्थ अभिमानही होता. आपल्या कुटुंबाबाबत ते म्हणाले होते, ‘आझम, मोईनुद्दीन, फरिद, अकबर, जाफर आणि मी सगळ्यांनीच प्रचंड प्रमाणात फुटबॉल खेळलं आहे.’