ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे कोणतेही कार्यकर्ते भांडलेले नाही, मी शिवसेनेला….; सुप्रिया सुळेंचं विधान


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात सुरू असलेला गदारोळ थांबायचं नाव घेत नाही. अजित पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरणांमध्ये कोणीही गल्लत करू नये. त्याचवेळी नातीगोती जपत असताना खाली कार्यकर्ते एकमेकांशी भांडत आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे एकमेकांबरोबर भांडण झालं नाही. गैरसमज नको. तसेच मी शिवसेना आणि काँग्रेसशी बोलले आहे. त्याची कुणी चिंता करायची गरज नाही.दरम्यान पवार साहेबांची सांगोल्याची सभा आणि प्रेस पाहिल्यावर कोणताही संभ्रम निर्माण होण्याची गरज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button