रशियात मोठी दुर्घटना! गॅस स्टेशनजवळील स्फोटात 12 ठार, 60 हून अधिक जखमी; नेमकं काय घडलं?
रशियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक गॅस स्टेशनमध्ये आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
ही दुर्घटना रशियातील दागेस्तानी शहरात घढली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आग महामार्गावरील एका ऑटो रिपेअररिंगच्या दुकानात लागली होती. येथे एक स्फोट झाल्याने ही आग पाहता पाहता जवळच असलेल्या गॅस स्टेशनपर्यंत पोहोचली. यामुळे गॅस स्टेशन भीषण आगीच्या विळख्यात आले. या आगीत एक, एक मंजली घरही जळून खाक झाले आहे. तसेच या आगीत होरपळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, येथे युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दागेस्तानीचे गव्हर्नर सर्गेई मेलीकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. ही आग एवढी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल साडेतीन तास लागले. या आगीने जवळपास 600 स्क्वेअर मिटरचा परिसर आपल्या विळख्यात घेतला होता.