मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची अपडेट; ‘या’ ठिकाणी होणार बैठक
सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पुण्यातील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
पुण्याहून आलेल्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नसल्याने संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मुंबईत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सकल मराठा समाजाच्या मागणीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.
माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज
शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा आरक्षण संबंधी बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सातारा, पुणे येथील कार्यकर्ते उशिरा आल्याने त्यांना पोलिसांनी दारावर रोखले. त्यामुळं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
आम्हाला गद्दार-खोकेबहाद्दर म्हणाले, आता हिम्मत असेल तर अजितदादांवर टीका करून दाखवा’
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा यावेळी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.