अजित पवारांसोबत गेलेले लोक दुःखी, आमच्याकडून जे झालं ते चुकीचं झालं असं सांगताहेत; शरद पवारांचा गौप्यस्फोट
‘अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले.’
सांगोला : भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही.
त्यामुळे आम्ही कुणीही भाजपबरोबर (BJP) जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.
आमच्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मतपरिवर्तनाचे प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जाणार नाही, असंही शरद पवार यांनी केलं.
Bhai Jagtap : संभाजी भिडेंना ‘माथेफिरू’ हा शब्दही सौम्य झालाय; काँग्रेस आमदाराची सडकून टीका
गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी पवार येथे आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. ”इंडिया आघाडीची ३१ रोजी मुंबईत प्राथमिक धोरण ठरविण्यासाठी बैठक आहे. एक सप्टेंबरला देशातील ४० पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. त्या बैठकीत काही मुद्द्यांवर निर्णय घेतला जाऊ शकतो; असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सत्ता काढून घेणे हाच अजेंडा असेल
राहुल गांधी पुन्हा खासदार झाले. पंतप्रधान पदासाठी इंडिया आघाडीत वादविवाद होतील का असा प्रश्न विचारला? तेव्हा शरद पवार म्हणाले की, ”पदासाठी वाद होणार नाही. सद्यःस्थितीत ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून ती काढून घेणे गरजेचे आहे.”
Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय
वडीलकीच्या नात्याने भेटलो
”अजित पवार यांच्यासोबत झालेली बैठक ही अजिबात गुप्त नव्हती. परंतु, माध्यमांनी त्यावर विनाकारण चर्चा केली. अजित पवार माझा पुतण्या आहे. वडिलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो तर ही माध्यमांमधील चर्चा होऊ शकत नाही. या भेटीने माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही,” असे पवार यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! दहशतवादाच्या संशयातून कोल्हापूर हिटलिस्टवर? ‘एनआयए’चे तीन ठिकाणी छापे, देशात 5 राज्यांत कारवाई
सोडून गेलेले दुःखी
शरद पवार म्हणाले, ”अजित पवारांसोबत गेलेले काही लोक दु:खी आहेत. काही लोक म्हणतात की, आमच्याकडून जे झाले ते चुकीचे झाले. काही उघडपणे बोलत नाहीत. पण त्यांचे दु:ख माझ्यापर्यंत आलेले आहे,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.