ताज्या बातम्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यास मृत्यदंड; नव्या विधेयकात तरतूद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुन्हेगारीसंबंधात तीन विधेयकं संसदेत आणली आहेत. या तीन विधेयकांमध्ये केंद्र सरकारकडून आमुलाग्र बदल सुचवण्यात आला आहे. जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यात बदल आणि राजद्रोहाचं कलम वगळण्यासंबंधी तरतुदी विधेयकात करण्यात आलेली आहे.
तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यास मृत्यदंड देण्याच्या शिक्षेची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर जरब बसण्याची शक्यता आहे.