रिपाइंच्या जन आक्रोश आंदोलनाने भूमी अभिलेख प्रशासनाची धांदल
रिपाइंच्या जन आक्रोश आंदोलनाने भूमी अभिलेख प्रशासनाची धांदल
सासवड : जागतिक आदिवासी दिन व क्रातीदिनाचे औचित्य साधून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने, मा उप अधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय तालुका पुरंदर जिल्हा पुणे, यांच्या कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले, यावेळी आंदोलनाची तिव्रतेचा अंदाज भूमी अभिलेख प्रशासनाला न आल्याने भूमी अभिलेख प्रशासनाची भंबेरी उडाली,
आंदोलनाची सुरुवात , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी नेते बिरसा मुंडा समशेरसिंग भोसले यांच्या प्रतिमेला रिपाइं नेते व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांच्या शुभहस्ते व रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, व स्वातंत्र्या लढ्यात शहीद झालेल्या क्रांतीकारकांना अभिवादन करुन करण्यात आली, यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ, सतिश केदारी , रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम स्टीवन जोसेफ, बळीराम सोनवणे, विजय जगताप, सासवड नगरपालिका फेरीवाला समितीचे संचालक गुलाबराव सोनवणे , रामकृष्ण वाघमारे सर, सुहास सहजराव किशोर पंडागळे, भिवा वळकुंदे, विजय घोडेस्वार , सचिन शिंदे, निलेश शिंदे,सचिन कांबळे, अजय शिंदे, आप्पा तोरवे, अंकुश मोटे, सिमा बेंगळे, श्रीरंग जगताप, बापूसाहेब जगताप, लक्ष्मण जगताप, यासह रिपब्लिकन पक्षाचे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे व कोथळे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, जनहित मंचाचे अध्यक्ष विजय जगताप , यांनी आंदोलन कर्त्यांना मार्गदर्शन करुन, भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्ट कार्यप्रणालीचा पाढा वाचला, व भूमी अभिलेख कार्यालयाने नागरीकांचे आर्थिक शोषण न थांबविल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा दिला, यावेळी, मौजे कोथळे ग्रामस्थांच्या १८७० चे इनामपत्र टिपन बुक वर असलेला समस्त महारवाडा, समस्त महार समाज हा भूमी अभिलेख कार्यालयाने टाळलेला उल्लेख पुन्हा सातबारा उतारा व इतर कागद पत्रावर करण्यात यावा अशी आग्रही मागणी केली,
तदनंतर मा.उप अधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय, यांनी चर्चा करण्यासाठी दालनात येण्याबाबतची विनंती केली, यावेळी कोथळे गावच्या प्रश्नांबाबत निरा शिवतक्रार पोखर वाघापूर येथील विविध प्रश्नांबाबत मा. उप अधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर यांना सतिश केदारी, विष्णूदादा भोसले, श्रीकांत कदम विजय जगताप बापूसाहेब जगताप यांनी धारेवर धरले यावेळी नकला काढण्यासाठी जादा पैसे घेणे, नकला मिळत नाही असे सांगणे ,व जादा पैसे दिल्यास नकल उपलब्ध करून देणे, मोजणीला हारकत देत असताना, हारकत न स्विकारणार्या कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, पहिली मोजणी झालेल्या क्षेत्रात व क पत्राची नक्कल दिलेली असताना त्यांच्या क्षेत्रात पुन्हा अतिक्रमण झाले आहे, असे सांगून वाद निर्माण करणे, या बाबत देखील आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले, यावेळी मा उप अधीक्षक साहेब विकास गोफणे यांनी तक्रारिची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, आणि कोणावरही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले, यावेळी, सहाय्यक कार्यालय प्रमुख सागर कांबळे, संदीप पवार हे प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते, तर सामाजिक कार्यकर्ते मोहन तळेकर आण्णा शिंदे, रमेश रणदिवे गुलाब रणदिवे मुन्ना भोसले, अशोक पवार ईश्वर शिंदे व विविध पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी मा.उप अधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय यांना निवेदन देण्यात आले,