Video : युक्रेनचा थेट रशियाच्या राजधानीवर हल्ला! विमानतळ केलं बंद
युक्रेनने थेट रशियाच्या राजधानीवरच हल्ला केला. मॉस्कोमध्ये ड्रोनच्या सहाय्याने दोन इमारतींवर हल्ला करण्यात आला.
याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
मॉस्कोचे मेयर सर्जे सोबयानिन यांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अर्थात, यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच, या इमारतींना जास्त नुकसान झालं नसल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर या हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Reported drone strike in Moscow, Russia 30/07/23. #Moscow pic.twitter.com/BH3ygmcCeH
— Jovian (@fuky0rign0rance) July 30, 2023
इमारती रशिया सरकारच्या शासकीय इमारती असल्याचं म्हटलं जात आहे. यातील आयक्यू क्वार्टर नावाच्या इमारतीमध्ये सरकारी कर्मचारी राहतात. या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Ukraine Attack)
सैन्याने पाडले ड्रोन
या हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून नुकावो विमानतळ बंद करण्यात आलं आहे. तसंच, रशियाच्या सैन्याने मॉस्कोच्या पश्चिम भागात युक्रेनचं आणखी एक ड्रोन नष्ट केल्याचंही सांगण्यात येत आहे.
रशियाला कोरियाची साथ?
दरम्यान, अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला मदत करत असल्याचे आरोप केले आहेत. नॉर्थ कोरिया समुद्रमार्गे रशियाला मोठ्या प्रमाणात मिसाईल आणि इतर शस्त्रं पुरवत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.