बहुजन रयत परिषदेच्या गेवराई तालुका उपाध्यक्षपदी अंकुश रोकडे यांची निवड
बहुजन रयत परिषदेच्या गेवराई तालुका उपाध्यक्षपदी अंकुश रोकडे यांची निवड
बीड : (सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील बहुजन रयत परिषदेच्या सर्व पदाधिकारी विषेश बैठक आज दिनांक २८/७/२०२३ रोजी सकाळी १२-०० वाजता हॉटेल गारवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे हे होते तर या बैठकीस प्रमुख पाहुणे बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन.व बहुजन रयत परिषदेचे बीड तालुका कार्याध्यक्ष मसु पवार . बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका सरचिटणीस योगीराज साळवे तसेच बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहराध्यक्ष नवनाथ जिजाऊ धुरंधरे व बहुजन रयत परिषदेचे शहर उपाध्यक्ष आनंद सुतार या सर्व पदाधिकारी यांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गेवराई तालुक्यातील मोजे डोईफोडवाडीचे उपसरपंच अंकुश रोकडे यांची बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी श्री अंकुश रोकडे यांना बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख भाऊ मोमीन व बहुजन रयत परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे व सर्व माण्यवराच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले यावेळी बहुजन रयत परिषदेच्या जातेगाव सर्कल प्रमुख म्हणून रमेश रोकडे यांची पण यावेळी निवड करण्यात आली यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रमुख पदाधिकारी विषेश उपस्थित बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहर सचिव तात्यासाहेब चौतमल . बहुजन रयत परिषद गेवराई शहर शाखा क्रमांक एक चे अध्यक्ष प्रशांत जाधव. गोपाळ पिंगळे सिद्धार्थ धुरंधरे प्रवीण चौतमल. विजय चव्हाण भाऊसाहेब हातागळे विशाल हातागळे सोमनाथ पोळ ऋषिकेश हातागळे संदेश हातागळे बाळू जाधव मुकादम इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी या बैठकीस अध्यक्ष हे मार्गदर्शन करताना परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश बप्पा धुरंधरे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की आता गेवराई तालुक्यामध्ये बहुजन परिषदेचा वार्ता जोर पाहून भाजप सेना राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते बहुजन रयत परिषदेच्या संघटनेमध्ये सामील होताना दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बहुजन रयत परिषद नक्कीच गेवराई तालुक्यामध्ये आघाडीवर असेल असे मत बहुजन परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष महेश दुरंधरे म्हणाले या बैठकीचे सूत्रसंचालन बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहराध्यक्ष नवनाथ धुरंधरे यांनी केले तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन बहुजन रयत परिषदेचे गेवराई शहर उपाध्यक्ष आनंद सुतार यांनी मांडले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले