बीड जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन तात्काळ उपलब्ध करा- मुकुंद भोसले
बीड जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन तात्काळ उपलब्ध करा- मुकुंद भोसले
बीड : जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशिन उपलब्ध नसल्यामुळे शासकिय रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये जावून अवाजवी रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयात तात्काळ एमआरआय मशिन उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा शिवराजे जनकल्याण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदराजे भोसले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मुकुंदराजे भोसले यांनी म्हटले आहे की, एका दिवसात 30 ते 40 रुग्णांच्या सर्व प्रकारच्या आजारांचे अचूक निदान करण्याची क्षमता असलेल्या एमआरआय मशीनमध्ये कमी वेळेत स्कॅन करण्याची सुविधा आहे. टीम प्लस डॉट अॅडव्हान्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि 16 चॅनेल ही या मशीनची वैशिष्ट्ये आहेत. हेलियम गॅसचा वापर करण्यात आलेल्या या मशीनला अतिशय कमी वीज लागते.मेंदूचे आजार, मणक्यांचे आजार, छातीचे आजार, पोटाचे आजार, गुडघ्याचे आजार यांचे अचूक निदान करणा-या या मशीनमध्ये शरीरातील अवयवांचे अतिउत्कृष्ट स्कॅन करण्याची विशेष व्यवस्था प्रग