मणिपूर हिंसाचारातील दोषींवर तात्काळ कारवाई करा – पिंपरी-चिंचवड रिपाइंची मागणी
मणिपूर हिंसाचारातील दोषींवर तात्काळ कारवाई करा – पिंपरी-चिंचवड रिपाइंची मागणी
मणिपूर येथील हिंसाचार त्वरित थांबला पाहिजे व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज करण्यात आली. उच्च
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे मणिपूर येथील हिंसाचार व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले
. यामध्ये मणिपूर या राज्यामध्ये दोन समाजामध्ये जे हिंसात्मक भांडणे चालू आहेत. ती आता शिगेला पोहोचली आहेत. महिलांची लग्न धिंड काढली जाते. बलात्कार केले जातात. त्यांचे खून केले जातात. अशा अमानवी घटना, माणूसकी ला काळीमा फासणाऱ्या घटना मणिपूर येथे घडत आहेत. अन्याय अत्याचाराचा कळस गाठलेली ही संस्कृती कोणी थांबवणार आहे का असा प्रश्न सध्या पडला आहे. गेले दोन ते तीन महिने हा हिंसाचार चालू आहे. तरीही केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर येथे तातडीने हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत व मणिपूर येथील हिंसाचारास महिलांचे धिंड काढण्यासाठी, बलात्कार करणारे व त्यांचा खून करणारे जे जे कोणी दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.
या आंदोलनासाठी चंद्रकांता ताई सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, अजिजभाई शेख, सुधाकर वारभुवन, ईलाबाई ठोसर ,अंकुश कानडी,सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी, लताताई ओव्हाळ, राजेंद्र कांबळे, कुणाल वाव्हळकर, कमलताई कांबळे, दयानंद वाघमारे, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, विनोद चांदमारे, प्रमोद वाघमैतर, संदीप तोरणे, संजय गायकवाड, राघू साबळे, धर्मेंद्र थोरात, लताताई लगाडे, रत्नमालाताई सावंत, लताताई वारभुवन, गोविंद सोनवणे, योगेश गायकवाड, भरत खरात,किसन मिसाळ, योगेश भोसले, किरण समिंदर, निलेश वाघमारे, भगवान कांबळे, राहुल कांबळे,कीर्तीवीर सोनकांबळे, अंकुश कांबळे, अशोक कांबळे, केशव साळवे, राजू अल्टे, दिनकर मस्के, संभाजी वाघमारे, दत्तू कांबळे, कैलास गोरे, विजय ठोसर, ज्योतीताई कांबळे, उषाताई शिरसाठ,सुवर्णा राक्षे उज्वला गोरे, अरुणा हुके, शशिकला काळे, पुनम इंगवले, माया ठोसर, सविता बगाडे, पुनम इंगवले, भगवान आढाव, पांडुरंग भागवत, बाबुराव जोगदंड , अशोक वाघमारे, बसवंत चंदनशिवे, दिलिप कांबळे, मुकुंद गायकवाड्, धेंडे , सदाशिव तळेकर ,आनंद उनवणे, इब्राहिम शेख, इकवाल शेख,पांडुरंग कांबळे, अशोक गायकवाड, तुकाराम दोडमनी, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.