महिलेचा हात धरणे हा विनयभंग नाही : कोर्ट
एर्नाकुलम : केवळ महिलेचा हात धरणे किंवा तिच्याविरुद्ध बळाचा वापर करणे हे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण केरळ न्यायालयाने नोंदवले आहे.एर्नाकुलमच्या अलुवा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी म्हटले आहे की, विनयभंग करण्याचा प्रयत्न फिर्यादीला सिद्ध करता आला नाही.पुरुषाने महिलेचा हात धरून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध करण्यातही अपयश आले. याचवेळी कोर्टाने धमकावल्याप्रकरणी त्या व्यक्तीला दोन वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
काय आहे प्रकरण?
२०१३ मधील हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. फिर्यादीनुसार, एक महिला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात धरला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
कोर्टाने म्हटले की, बळाचा वापर करणे हा गुन्हा नाही. महिलेचा विनयभंग करण्याचा हेतू सिद्ध केला पाहिजे. केवळ महिलेचा हात धरून तिला ठार मारण्याची धमकी देणे कलम ३५४ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही.