शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी अकाउंटमध्ये येणार पीएम किसानचा 14 वा हप्ता
मुंबई: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसानचा 14 (PM Kisan Yojana) वा हफ्ता 28 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. या दिवशी सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयांचा हप्ता (PM Kisan Yojana) पोहोचेल.वर्षभरात तीन वेळा सरकारकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 हजार ट्रान्सफर केले जातात.
हाती आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी 14 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. ज्याचा फायदा सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. पीएम मोदी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सुमारे 18 हजार कोटी रुपये पाठवणार आहेत. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता 14 वा हप्ता जारी करतील. मात्र, तुम्ही आतापर्यंत दोन महत्त्वाची कामे पूर्ण केली नसतील, तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे.
असे करा ई-केवायसी
सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जा.
वेबसाइट उघडल्यावर तुम्हाला स्क्रीनच्या शेतकऱ्याच्या कोपऱ्यात ई-केवायसीचा पर्याय निवडावा लागेल.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल
आता येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
आता सर्च बटणावर क्लिक करा
यानंतर, तुमच्या आधारवरून नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
आता OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.