अभिनेते रवींद्र महाजनी यांचा संशयास्पद मृत्यू
पुणे: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे धक्कादायक निधन झाले आहे. पुणे येथील निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह आज आढळला असला तरी, महाजनी यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी भागात ते एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहात होते, दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी त्यांच्या भेटीला येऊन गेल्याचे वृत्त आहे. मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांनी 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.
रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली असून तो तात्काळ पुण्यात दाखल झाला. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे. तळेगाव ग्रामीण रुग्णालयात रविंद्र महाजनींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाजनी यांचा जन्म बेळगाव इथे झाला असून, त्यांचे बालपण मुंबईत गेले. ”झुंज” हा त्यांचा पहिला चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला. महाजनी यांचा ”मुंबईचा फौजदार” हे चित्रपट तुफान गाजला. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच इथं राहत होते. भाड्याने हा फ्लॅट त्यांनी घेतला होता. Ravindra Mahajani Dead मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे त्याच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेंव्हा ते मृतावस्थेत आढळले. सर्व परिस्थिती पाहिली असता 2-3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.