खातेवाटपाचा तिढा सुटेना! रोहित पवार म्हणाले,आश्चर्य वाटतं की दादा इथे असताना…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्यासह इतर ९ मंत्र्यांच्या खातेवाटपाची चर्चा सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची सुरु आहे.यासाठी सलग दोन दिवस रात्री तिन्ही नेत्यांची बैठकही झाली. तरी खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, यावरून आमदार रोहित पवार यांनी टीका केलीय. अजित दादा इथे होते तेव्हा खाते वाटपाचा निर्णयही तात्काळ घ्यायचे.
आता आश्चर्य वाटतंय अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. तसंच दादा कुठे ही फरफटत जाणार नाहीत योग्य वेळी ते ताकद दाखवतील असंही रोहित पवार यांनी म्हटलं. रोहित पवार म्हणाले की, दादा इथे होते तेव्हा खाते वाटपाचा निर्णय देखील तात्काळ घ्यायचे. महाविकास आघाडीत देखील सगळं स्पष्ट होतं.
दोन्ही पक्षात जेवढी भांडण होतील तेवढा भाजपचा फायदा आहे. मात्र या सगळ्यात सामान्य माणसाचं नुकसान होत आहे त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये देखील खाती आधी ठरली होती. तीन पक्षांच्या सरकारवरूनही रोहित पवार यांनी निशाणा साधला.
ते म्हणाले की, इथे तिन्ही चाक वेगळ्या दिशेने चालली आहेत, महाराष्ट्र मात्र आहे तिथेच आहे. सरकारमध्ये सध्या अशांतता आहे, तिन्ही पक्षाचे आमदार भांडत आहेत. कोकणातला एक आमदार आणि मराठवाड्यातला एक आमदार भांडतोय. चार दिवस थांबत थांबत यांनी वर्ष काढलं.
अनेक खाती एकाकडे असल्यामुळे खात्याची कामं होत नाहीत. राज्यात मोठा गोंधळ असून जिल्हा परिषदेतच निधी दिला जात नाही. सार्वजनिक बांधकामाची विभागाची काम सुरू आहेत पण निधी दिला जात नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई अद्याप दिली गेली नाही.
कांद्याचे अनुदान अद्याप मिळालं नाही. आमदार निधीला देखील टप्पे करण्यात आले आहेत. पैसा आहे की नाही? का कोणाला खुश करण्यासाठी वापरला जातोय असे प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केले.