वर्षा गायकवाड पोलीसांच्या ताब्यात!
मुंबई: मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांची कोर्टाने याचिका फेटाळली आहे. याविरोधत काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी कोर्टाच्या निर्णयाचा आपण सर्वजण आदर करतो.
पण, ज्याप्रकारे खटल्याची सुनावणी झाली त्याबद्दल खेद वाटतो. राहुल गांधींच्या निर्भयतेने आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोत. आम्ही सरकारला घाबरणार नाही. असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
… म्हणुन कोर्टाने याचिका फेटाळली
‘मोदी’ आडनाव बदनामी प्रकरणी शिक्षेस स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळला जातो. राहुल गांधींवर किमान १० गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.’
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, राहुल गांधी यापुढे २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत, तसेच ते त्यांच्या खासदार पदावरील निलंबन मागे घेण्याची मागणी करू शकणार नाहीत. राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व आधीच गेले आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी करताना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. उन्हाळी सुट्टीनंतर अंतिम आदेश देऊ असे सांगितले होते.