मुंबई पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! 26 मिनिटात शोधली 3 वर्षांची हरवलेली चिमुकली
मुंबई : मुंबई पोलीस नेहमी नागरिकांसाठी तत्पर असतात. त्याचे दाखले वेळोवेळी मिळतात. गस्त असो किंवा कोणतीही अडचण मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. 3 वर्षांची चिमुकली हरवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि तातडीनं चिमुकलीचा शोधून काढलं. सोमवारी ०२.०७.२३ रोजी एक ०३ वर्षीय मुलगी वडाळा पूर्व मुंबई येथून हरवील्याची तक्रार वडाळा पोलीस ठाण्यात आली. कर्तव्यावर असणारे पोलिसांनी आसपासच्या परिसरात सर्तकतेने गस्त घालत सदर मुलीचा अवघ्या २६ मिनिटांमध्ये शोध घेऊन पोलिसांनी या चिमुकलीला शोधून काढलं.
पोलिसांनी या चिमुकलीला शोधून पालकांनी पोलिसांचे आभार मानले. यानंतर मुंबई पोलिसांनी ट्विट करुन माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या कर्तव्याला सलाम केला आहे. ट्विटरवरही मुंबई पोलिसांचं खूप कौतुक केलं जात आहे.