म्हणून साजरी केली जाते बकरी ईद, इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
गडचिरोली : भारतात ईद उल अजहा आज साजरी करण्यात आली. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरीईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. रमजान महिन्यात तीस दिवस उपवास करून रमजानची ईद साजरी केली जाते. तर बकरीर महिन्यात जवळपास दहा उपवास काही नागरिक करीत असतात. बकरी ईद सणाच्या दिवशी बकरा कुर्बान करून प्रत्येक आपल्या नातेवाईकाला आणि काही गरीब लोकांना त्याच्या मटन वाटप करीत असतात.
बकरी ईद सण फार प्राचीन काळापासून मुस्लीम समाजाचे पैंगावार असलेले इब्राहिम यांच्या काळापासून बकरा कापून बकरी ईद ही साजरी केली जाते. मोहम्मद सल्लेल्लाहु आणि अलैह सल्लम हे मुस्लीम समाजाचे शेवटचे पैगंबर होते. यांच्या मान्यतेनुसार मुस्लीम समाज प्रत्येक सण आपल्या जीवनशैलीनुसार जगत असतात.
हज यात्रा ४० दिवसांची
आज एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण सोबत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक भागात चौक पोलीस बंदोबस्त करण्यात आला. बकरीर महिन्याच्या जवळपास 40 दिवसा अगोदर मुस्लीम नागरिक हज यात्रेला जातात. हज यात्रा जवळपास 40 दिवसाची असते. बकरी ईदच्या दिवशी मक्का हजसाठी गेलेले नागरिक बकरी ईद साजरी करतात.
तेव्हापासून सुरू झाली प्रथा
हजरत इब्राहीम यांच्यामुळे कुर्बानी देण्याची प्रथा सुरू झाली. त्यांना वयाच्या ९० व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली. तरीही अल्लाहच्या मुर्जीनुसार मुलगा कुर्बान देण्यासाठी ते तयार झाले. पण, एका व्यक्तीने त्यांना मुलाच्या कुर्बानीपासून रोखले. बकऱ्याची कुर्बानी दिली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं.
राज्यात पोलीस बंदोबस्त
यावेळी गडचिरोली जिल्ह्यात एका मोठ्या संख्येत हजसाठी नागरिक यात्रेवर गेले आहेत. आज एकादशी आणि बकरी ईद मिळून आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त पोलिसांकडून तयार करण्यात आला. आज गडचिरोली जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहाने गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातही साजरी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात शांततेत प्रत्येक ठिकाणी नमाज पार पडली. सिरोंचा येथील ईदगा मैदानात मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. याच्याच भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातही शांततेत ईदची नमाज प्रत्येक तालुका ठिकाणी अदा करण्यात आली.