‘मैं यहां का डॉन हूं’ म्हणत केली खंडणी मागितली
नागपूर : अजनीतील गुन्हेगारांनी चाकूच्या धाकावर तरुणाकडे खंडणी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गौरव रगडे आणि अर्जुन उर्फ चेनी (वय २६) अशी आरोपींची नावे आहेत
पीडित संकेत शंभरकर हा रामदासपेठ येथील एका कॅफेमध्ये काम करतो. पूर्वी ते कौसल्यानगर येथे राहत होता. काही दिवसांपूर्वीच तो कुंजीलालपेठेत येथील ह्युमॅनिटीज शाळेजवळ वर्मा यांच्या घरात भाड्याने राहायला आला आहे.
२० जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता आरोपी गौरव आणि त्याचा साथीदार अर्जुन उर्फ चेनी संकेतच्या घरी आले. भिंतीवरून उडी मारून ते संकेतच्या घरात प्रवेश केला. दारावर लाथ मारत ‘संकेत बाहेर ये’ म्हणू लागला. बाहेर येताच आरोपी घरात घुसला आणि संकेत आणि त्याच्या वडिलांशी भांडू लागला. आरोपींनी संकेतला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली आणि त्याच्या वडिलांनाही मारहाण केली. संकेतला चाकू दाखवून, ‘तू इथे राहायला कसा आलास, मैं यहां का डॉन हूं, तुला इथे रहायचे असेल तर पाच हजार रुपये’ महिना द्यावा लागेल, असे आरोपींनी म्हटले. आरोपी अर्जुन उर्फ चेनी याने संकेतला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यातून भीतीपोटी संकेतने आरोपीला ५०० रुपये दिले. त्यानंतर आरोपी परत त्याला धमकावत बाहेर निघून गेला.
संकेतने अजनी पोलिस ठाणे गाठत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या फिर्यादीवरून अजनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांनी आरोपींविरुद्ध कलम ३८६, २९४, ३२३, ४५२, ५०६ (ब), उपकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी गौरव व अर्जुन उर्फ चेनी याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात आणखी गुन्हे दाखल असल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली.