ताज्या बातम्यामहाराष्ट्र
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे आमदार दत्तात्रय भरणेंनी केले सारथ्य
भवानीनगर : येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आगमन झाले असता आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखीच्या रथाचे सारथ्य केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांची पत्नी वैशाली पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सचिन सपकळ, संचालक ऍड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, राजेंद्र गावडे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर, यशवंत नरोटे निंबाळकर, विक्रम निंबाळकर, संतोष चव्हाण, वसंत जगताप, अमोल भोईटे उपस्थित होते.