अक्षय भालेराव, गिरीधर तपघाले , यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व विविध विषयांबाबत २० जून रोजी सासवड येथे रिपाइंचे जन- आंदोलन
अक्षय भालेराव, गिरीधर तपघाले , यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व विविध विषयांबाबत २० जून रोजी सासवड येथे रिपाइंचे जन- आंदोलन
सासवड : बोंढार हवेली जिल्हा नांदेड येथील भिमसैनिक अक्षय भालेराव , लातुर जिल्ह्यातील रेणापूर येथील मातंग समाजातील युवक गिरीधर तपघाले यांची निघृणपणे हत्या व मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृहातील मुलीवर बलात्कार करुन तिची केलेली हत्या याच्या निषेधार्थ , व विविध विषयाबाबत मंगळवार दि. २० / ६ / २०२३ रोजी सकाळी ठिक ११ ते ५ या वेळेत, सासवड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने, मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर- दौंड यांच्या कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याबाबतचे लेखी निवेदन, रिपब्लिकन पक्षाचे नेते व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील , मा. जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख पुणे विभाग, मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा, मा. अधिक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय पुणे जिल्हा, मा.उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर – दौंड , मा. तहसिलदार साहेब तालुका पुरंदर ,मा.उप अधिक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर, मा, पोलीस निरीक्षक साहेब सासवड पोलीस स्टेशन यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे,
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले , यांच्या आदेशानुसार व रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष पॅंथरनेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात येणार असून विविध मान्यंवर पदाधिकारी या आंदोलनास उपस्थितीत राहणार आहेत . अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष नामदेव नेटके यांनी दिली,
या आंदोलनात बोंढार हवेली नांदेड येथील भिमसैनिक अक्षय भालेराव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याची कनिघृणपणे केलेली हत्या, लातुर जिल्ह्यातील रेणापूर येथील मातंगसमाजाच्या गिरीधर तपघाले या तरुणांचा तीन हजार रुपयांच्या कर्जापाई सावकाराने केलेली जबरी मारहाणीत झालेला मृत्यू, व मुंबई येथील सावित्रीबाई फुले वस्तीगृहातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली या मानवतेला कलंकीत करणार्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी, तसेच १ ) शासनाच्या वतीने, शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या नागरीकांना अतिक्रमण काढून टाकण्याबाबत दिलेल्या महसूल विभागाने व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नोटीसा तात्काळ रद्द करण्यात याव्यात, व घरकुल बांधण्यासाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्यात यावे, तसेच जे बेघर आहेत अशांना शासनाच्या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी शासकीय गायरान क्षेत्रात जागा देण्यात यावी, २ ) जातीचा दाखला काढण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात,
३ ) मा. उप अधीक्षक भूमी कार्यालय पुरंदर , यांच्या भ्रष्टकार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी, व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामकाजाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी,
४ ) तसेच मौजे कोथळे येथील सर्वे नंबर २२५ चे २३ हिस्से करताना , १८७० चे इनामपत्र व कडवानपत्रावर समस्त महारवाडा असा असलेला उल्लेख भूमी अभिलेख कार्यालय व महसूल विभाग यांच्या नजरचुकीने किंवा हालगर्जीपणामुळे टाळण्यात आलेला उल्लेख हिस्सा नंबर २३ चा पुढे गटवारी नंतर झालेल्या गट नंबर १८ या गटावर फाळणी नकाशा व स्किम बुकवर करण्यात यावा ,व मौजे कोथळे तालुका पुरंदर येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होत असलेल्या सामाजिक सभागृहाचे बंद करण्यात आलेले काम पुन्हा सुरू करण्यात यावे , या मागणीसाठी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर दौंड यांच्या सासवड येथील कार्यालयासमोर सदर आंदोलन करण्यात येणार आहे, या विषयाशी निगडीत असलेल्या नागरीकांनी या आंदोलनास उपस्थितीत राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी केले आहे.